Home > मॅक्स रिपोर्ट > आदिवासींच्या प्रश्नावर विधानसभेत अल्पकालीन चर्चा आणि सभात्याग

आदिवासींच्या प्रश्नावर विधानसभेत अल्पकालीन चर्चा आणि सभात्याग

आदिवासींच्या प्रश्नावर विधानसभेत अल्पकालीन चर्चा आणि सभात्याग
X

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना दुर्गम भागात अविकसित आदिवासींच्या प्रश्नांबाबत सरकार आणि आदिवासी मंत्री असलेले असल्याचे सांगत विरोधकांनी सभात्याग केला. विरोधी पक्षाने उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेतही आदिवासी भिकारी योजनात मोठं लिकेज असल्याचं आक्षेप लोकप्रतिनिधीनींनी घेतला.

तत्पूर्वी कुपोषणाच्या मुद्यावर आदिवासी मंत्र्यांकडून आलेल्या असंवेदनशील उत्तराने आम्ही समाधानी नाही. आदिवासी मंत्र्यांचा निषेध म्हणून सभात्याग करत असल्याचे गटनेते जयंत पाटील यांनी जाहीर केले. यानंतर सर्व आमदारांनी सभात्याग केला.

राज्यातील कुपोषित बालकांचा मृत्यू होत असताना आदिवासी विकास मंत्री योग्य उत्तर देत नाहीत. ते आरोग्य मंत्र्यांकडे प्रश्न ढकलत आहेत. मग आरोग्य मंत्र्यांकडे उत्तर असते तर त्यांनी उत्तर दिले असते. मात्र, योग्य उत्तर सभागृहात दिले जात नाही तोपर्यंत आमचे समाधान होणार नाही. त्यामुळे हा प्रश्न राखून ठेवावा अशी मागणीही जयंत पाटील यांनी सभागृहात केली. दरम्यान हा प्रश्न रेटून नेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे लक्षात येताच जयंत पाटील आक्रमक झाले आणि आदिवासी विकास मंत्र्याचा निषेध करत असल्याचे जाहीर केले.

आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी एकही बालमृत्यू कुपोषणाने झालेला नसल्याची माहिती सभागृहात दिली. याबाबतची सर्व माहिती हायकोर्टात दिली असल्याचे त्यांनी म्हटले. यावर शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मंत्री महोदय कुपोषणाबाबत चुकीची माहिती देत असल्याचे सांगितले. आदिवासी सामाजाची अवस्था पाहिल्यानंतर आपल्याला ही लाज वाटली पाहिजे असं वक्तव्य आदित्य यांनी केले. या वक्तव्यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार चांगलेच आक्रमक होत लाज वाटली हा शब्द वापरला नाही पाहिजे, असे म्हणत या शब्दावर आक्षेप घेतला. यावेळी आदित्य यांच्या मदतीसाठी जयंत पाटील धावून आले. आदिवासी मंत्री यांच्या मदतीला वन मंत्री धावले आहेत. मात्र, त्यांनी गैरसमज करु नये असे पाटील यांनी सांगितले. आदित्य ठाकरे यांनीदेखील आदिवासी समाजाची परिस्थिती बघताना राजकारणी म्हणून आपल्याला लाज वाटेल असे म्हणालो असल्याचे सांगितले.

अल्पकालीन चर्चेमध्येही विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आदिवासींच्या मेळघाटातील समस्यांबाबत आवाज उठवला.

महिलांच्या आणि मुलांचे कुपोषण हा गंभीर मुद्दा असून.. सामाजिक प्रश्नांमुळे लागोपाठ बाळंतपण येतात आणि आदिवासी महिला भरडल्या जातात असाही मुद्दा अजित पवार यांनी उपस्थित केला. आमदार यशोमती ठाकूर, आमदार देवराव होळी आणि इतर सदस्यांनी चर्चेत सहभाग घेतला.concern of tribals in legislative assembly

concern of tribals in legislative assembly

Updated : 25 Aug 2022 4:15 PM IST
Next Story
Share it
Top