Home > Election 2020 > उत्तर प्रदेशात सायकल आणि हत्तीचा कमळाला फटका?

उत्तर प्रदेशात सायकल आणि हत्तीचा कमळाला फटका?

उत्तर प्रदेशात सायकल आणि हत्तीचा कमळाला फटका?
X

आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपला फटका बसणार असा अंदाज एका निवडणूकपूर्व सर्वेक्षणातून दिसून आला आहे. लोकसभेच्या दृष्टीने देशाचा विचार केला असता सर्वात जास्त म्हणजे ८० सीट एकट्या उत्तर प्रदेशात आहे. त्याचबरोबर भाजपचा बालेकिल्ला म्हणून हा राज्य समजला जातो. त्यामुळे केंद्रात आपलं वर्चस्व राखण्यासाठी प्रत्येक पक्षाला हे राज्य महत्व्याचे असते. मात्र एका निवडणूकपूर्व सर्वेक्षणातून उत्तर प्रदेशात भाजपला केवळ ३६ जागांवरच विजय मिळणार असून त्यांना ४० जागांचे नुकसान सोसावे लागणार आहे असं म्हटलं आहे. त्याचबरोबर इतर प्रादेशीक पक्षांचा विचार केला असता बसप-सप-आरएलडी महाआघाडीला ४२ जागांवर विजय मिळणार असून केवळ दोनच जागा काँग्रेसला मिळणार आहे असा अंदाज एबीपी न्यूज आणि नेल्सनच्या सर्वेक्षणातून वर्तवण्यात आला आहे.

याआधी २०१४ च्या निवडणुकीचा विचार केला असता ८० पैकी ७३ जागा भाजपला मिळाल्या होत्या. मात्र यावेळी मोदींची लाट कमी झालेली दिसून येते.

Updated : 5 April 2019 11:20 AM IST
Next Story
Share it
Top