कोणी भाजी घेता का भाजी? लॉकडाऊनमुळे भाजी विक्रेत्यांची परवड
X
औरंगाबाद जिल्ह्यात वाढते कोरोनाचे रुग्ण लक्षात घेता. जिल्हा प्रशासनाने अंशतः लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वात मोठी भाजी मंडी म्हणून ओळख असलेली जाधवमंडी 11 मार्च पासून 17 मार्चपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयावर शेतकरी आणि भाजी विक्रेते यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शेतातील पीक काढणीला आले आहे. मात्र, मंडीच बंद असेल तर विकायचं कुठं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
शेतकऱ्यांप्रमाणेच भाजीपाला विक्री करणाऱ्या भाजीविक्रेत्यांची परिस्थिती आहे. जर मंडी बंद झाली. तर आम्ही व्यापाऱ्यांनी कुठं काम करावे? असा प्रश्न त्यांना पडला आहे. तर अगोदरच तीन महिने झालेल्या लॉकडाऊनमधून आम्ही सावरलेलो नाही. त्यात आता पुन्हा जर सात दिवसांचा लॉकडाऊन लागला तर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा? अशी चिंता भाजीविक्रेते आणि व्यापाऱ्यांना सतावत आहे...
अतिवृष्टी आणि त्यानंतर अवकाळी पावसाने आधीच शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. त्याचप्रमाणे छोटे-मोठे व्यापाऱ्यांना गेल्या वेळच्या लोकडाउन मध्ये बसलेल्या आर्थिक फटका आजही जाणवत आहे. त्यामुळे अशात पुन्हा जर लॉकडाऊन लागले तर याचा फटका शेतकरी आणि व्यापाऱ्यांना पुन्हा सहन करावा लागणार आहे. त्यामुळं सरकारनं लॉकडाऊन लावताना या लोकांच्या पोटावर कुऱ्हाड येणार नाही. याची काळजी घ्यायला हवी.