Home > मॅक्स रिपोर्ट > "आमचे बापजादे इथेच मेले, आम्ही पण इथेच मरणार" सिडकोच्या कारवाईला स्थानिकांचा विरोध

"आमचे बापजादे इथेच मेले, आम्ही पण इथेच मरणार" सिडकोच्या कारवाईला स्थानिकांचा विरोध

पनवेल जिल्ह्यातील एका संपूर्ण गावाला हाकलून देण्याचा प्रयत्न सिडको करत आहे, असा गंभीर आरोप तिथल्या गावकऱ्यांनी केला आहे. इथले वास्तव मांडणारा आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांचा ग्राऊंड रिपोर्ट

आमचे बापजादे इथेच मेले, आम्ही पण इथेच मरणार सिडकोच्या कारवाईला स्थानिकांचा विरोध
X

पनवेल महानगर पालिकेच्या हद्दीतील खारघर जवळ असलेले आदिवासी धमोळे गाव,सिडको उठवण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोप इथल्या गावकऱ्यांनी केला आहे. सिडकोने गावाजवळ असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी खोदकाम सुरू केले आहे, तसेच गावाला इथून हवटले जाईल, अशी धमकी दिल्याचा आरोपही इथले गावकरी करत आहेत.





" मागील चार ते पाच पिढ्या इथेच राहिल्या असून,आता आम्हाला नाहक त्रास देत असल्याचा आरोप इथलो लोक करत आहेत. एवढेच नाही तर सिडकोने पाण्याची पाईप लाईन तोडल्याचा आरोपही इथले लोक करत आहेत.




"मागील एका वर्षापासून जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांताधिकारी अन्य संबधित अधिकारी यांना पत्र व्यवहार केले मात्र काहीच प्रतिसाद मिळाला नाही" असा आरोप गावातील एका आदिवासी तरुणाने केला आहे. "सिडको इथे काय करत हे सांगतही नाही, फक्त आम्हाला दुसरीकडून समजते ,की इथे गोल्फ कोर्स होणार आहे,आमच्या गावात खूप वेळा बुलडोझर घुसविण्याचा प्रयत्न केला गेला" असा आरोपही त्याने केला आहे.





कोणत्याही परिस्थितीत गाव सोडणार नाही, असा इशारा इथल्या गावकऱ्यांनी दिला आहे. यावर सिडकोची बाजू जाणून घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधीने सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रतांबे यांना संपर्क साधाल तेव्हा, "आम्ही यावर काहीच बोलू शकत नाही" एवढीच प्रतिक्रिया दिली.

Updated : 11 April 2022 4:21 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top