साहित्य संमेलन झालंय पैशांसाठी मुजोर?
X
आज पासून यवतमाळ येथे 92 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात झाली. तीन दिवसीय संमेलनाची सुरुवातीपूर्वी उद्घाटकांच्या मुद्यावरुन चांगलाच वाद निर्माण झाला होता. प्रख्यात लेखिका नयनतारा सहगल यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार होते मात्र काही कारणास्तव त्यांच्या नावाची वापसी करुन आता हे संमेलन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबातील महिलेच्या हस्ते होणार आहे.
मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी बीबीसी मराठी यांना दिलेल्या मुलाखतीत आरोप केला की स्वागताध्यक्षांच्या (भाजपचे मंत्री मदन येरावार) प्रतिनिधींनी दबाव आणला की सहगल यांच निमंत्रण मागे घेतलं नाही तर संमेलनाच्या आर्थिक नाड्या आवळल्या जातील. म्हणून लेखिका नयनतारा सहगल यांच्या नाव मागे घेण्यात आलं. नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द केल्यानंतर निर्माण झालेल्या वादानंतर जोशी यांनी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
काय म्हटले श्रीपाद जोशी बीबीसी मुलाखतीत
"कुणीतरी आयोजकांना धमकी देऊन त्यांना नको असलेली व्यक्ती विथड्रॉ करून घेतं. कुटिल कारस्थान रचून याचा मागमूसही लागू देत नाही. आणि त्याचं खापर महामंडळांच्या अध्यक्षांवर फोडलं जातं, ही मराठी भाषिक समाजात अत्यंत लाजिरवाणी घटना आहे," असं ते म्हणाले. साहित्य संमेलनाच्या आयोजकांना धमकी देऊन कुटिल कारस्थान रचलं जातेय असं श्रीपाद जोशी म्हटले आहेत.
तसेच घडलं असं की स्वागताध्यक्षांचे (मदन येरावार) प्रतिनिधी आणि शाखाध्यक्ष (डॉ. रमाकांत कोलते) यांनी अडचणीत येऊन विदर्भ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांकडे म्हटलं की आम्ही जर ही कृती केली नाही तर या संमेलनाचा कणा असलेलं जे अर्थकारण आहे, त्याच्या नाड्या आवळल्या जात आहेत. अंग काढून घेतलं जाणार आहे. ती अडचण भागवून द्या, नाहीतर संमेलन होत नाही," असं ते म्हणाले.
"जोपर्यंत संमेलनं आर्थिक आघाडीवर परावलंबी आहेत, तोपर्यंत असे प्रकार घडत राहणार," असं देखील श्रीपाद जोशी म्हणाले.
तसेच यावेळी बोलताना त्यांनी कुठल्याही व्यक्तीचं नाव घेतलं नसलं तरी स्वागताध्यक्ष या शब्दाचा वारंवार उल्लेख करून भाजपचे नेते आणि यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार यांच्याकडे इशारा करत होते.
श्रीपाद जोशींच्या यांच्या या वक्तव्यावरुन हे स्पष्ट होतेय की आर्थिक आघाडीसाठी हा सगळा वाद निर्माण झाला. साहित्य संमेलन फक्त आर्थिक परिस्थिती साठी आपल्या लेखनीवर राजकीय पुढाऱ्यांची गदा आणतायत का? साहित्य संमेलनाला राजकीय सहभाग का लागतोय.. पैशांसाठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मुजोरपणा करतेय का असा प्रश्न याठिकाणी उपस्थितीत होतोय.