Home > मॅक्स रिपोर्ट > कन्यादान कि कन्यामान?

कन्यादान कि कन्यामान?

कपड्यांच्या 'मान्यवर मोहे` ब्रँडच्या जाहिरातीत बॉलिवुड अभिनेत्री आलिया भट्ट नवरीच्या साजश्रृंगारात मंडपात बसली आहे. ती रिती-रिवाज आणि परंपरेच्या जोखडात अडकून पडलेल्या मुलीच्या मनात येणारे प्रश्न बोलून दाखवत आहे. वडिलांचं घर मुलीचं का नसतं? मुलीला नेहमी परक्याचं धन का म्हटलं जातं? तिचं कन्यादान का केलं जातं? जाहिरातीच्या शेवटी मुलाचे आई-वडीलही आपल्या मुलाचा हात मुलीच्या हातात देण्यासाठी पुढे करतात आणि आलिया म्हणते, 'नया आयडिया, कन्या मान'.. या जाहीरावरुन सोशल मिडीयात वादळ उठले असून कुणी जाहीरातीचे स्वागत करत आहे तर कुणी जाहीरात हिंदु संस्कृतीवर आक्रमण असल्याचे सांगत कन्यादान म्हणजे एका गोत्रातून दुसऱ्या गोत्रात प्रवेश करण्याचा हिंदु विधी असल्याचे सांगत आहे. या जाहीरातीवरुन उठलेल्या वादळात कन्यादान असावे कि कन्यामान ? यातून महीलासक्षमीकरण, समानता आणि पुरुषी मानसिकतेचा सांस्कृतिक आणि संविधानिक मार्गाने घेतलेल्या चर्चेच सहभागी झाले आहेत.. निवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे आणि जात पंचायतीच्या सामाजिक कार्यकर्त्या दुर्गा गुडिलू....

Updated : 23 Sept 2021 9:36 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top