Home > मॅक्स रिपोर्ट > इतिहास घडवणारी कनकदुर्गा घरी पोहोचली पण...

इतिहास घडवणारी कनकदुर्गा घरी पोहोचली पण...

इतिहास घडवणारी कनकदुर्गा घरी पोहोचली पण...
X

शबरीमाला येथील अय्यप्पा मंदिरात प्रवेश करुन इतिहास घडवणाऱ्या कनकदुर्गा (४४) आणि बिंदू (४२) या महिलेचं सर्वत्र होत असताना कनकदुर्गा घरातल्यानींच मारहान केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कवकदुर्गाला तिच्या सासुनेच घरी बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत कनकदुर्गा जखमी झाली असून, तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावरुन कनकदुर्गा यांनी अय्यप्पा मंदिरात प्रवेश करण्यास त्यांच्या सासरबरोबरच माहेरच्या मंडळींचाही विरोध होता हे स्पष्ट झालं आहे.

कनकदुर्गा आणि बिंदू (४२) यांनी तीन जानेवारी रोजी अय्यप्पा मंदिरात प्रवेश करुन इतिहास घडवला होता. त्यानंतर कनकदुर्गा भूमिगत झाल्या होत्या. मंगळवारी सकाळी त्या पेरिंतलमन्ना (जि. मल्लपुरम) येथील आपल्या घरी पोहोचल्या. त्यांनी घरात प्रवेश करताच सासूबरोबर त्यांचा शाब्दिक वाद झाला. या वादानंतर कनकदुर्गाला तिच्या सासुने काठीने मारहाण केली. या मारहाणीत कनकदुर्गा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले. 'माझ्या सासूने मला काठीने झोडपून काढले,' असे कनकदुर्गा यांनी हॉस्पिटलमध्ये टीव्ही वाहिन्यांना सांगितले.

दरम्यान, त्यानंतर कनकदुर्गा यांच्या वयोवृद्ध सासूला देखील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून कनकदुर्गानेच सासूवर हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे.

Updated : 16 Jan 2019 11:13 AM IST
Next Story
Share it
Top