Home > मॅक्स रिपोर्ट > #IWGA2019 आय वूमन ग्लोबल अॅवार्ड यंदा पुण्यात

#IWGA2019 आय वूमन ग्लोबल अॅवार्ड यंदा पुण्यात

समाजिक कार्य करणाऱ्या महिलांना प्रेरणा देणारा आय वूमन ग्लोबल अॅवार्ड महिला दिनी अर्थात 8 मार्चला पुणे येथे पार पडणार आहे. यंदा हा कार्यक्रम १८ मे ला अमेरिका , स्पेन , मेक्सिको या देशांमध्ये सुद्धा होतो आहे. भारतामध्ये खूप साऱ्या महिला विविध विभागामध्ये कार्यरत आहेत त्या खूप चांगले समाजकार्य करत आहेत अश्या महिलांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देणे हे या पुरस्काराचा उद्देश आहे.

https://youtu.be/uWd7wLDDVYQ?t=12

महिला सशक्तीकरणासाठी एकत्रितपणे आय वूमन ग्लोबल अॅवार्ड ही संस्था कार्यरत आहे. असंख्य महिला समाजामध्ये कार्य करत असतात हे काम समाजाला कळावे या उद्देशाने या अॅवार्डची सुरवात २०१७ मध्ये झाली . पूनम खोत निवृत्त आर्मी ऑफिसर आहेत १२ वर्ष इंडियन आर्मी मध्ये काम करून ते आय वूमन ग्लोबल अॅवार्ड या NGO संस्थेमध्ये काम करत आहे. यांसंदर्भातील अधिक माहिती पूनम खोत देत आहेत.

Updated : 26 Feb 2019 6:52 PM IST
Next Story
Share it
Top