Home > मॅक्स रिपोर्ट > आम्ही शेतात ऊस लावलाय आमची काय चूक झाली का...?

आम्ही शेतात ऊस लावलाय आमची काय चूक झाली का...?

उसाच्या फडाला जर काडी लावली तर आम्हीच आमच्या अंगाला काडी लावल्यासारखं होतयं...!आम्ही जर पिकलं नाही तर तुम्ही काय खाणार...! वाहन चालक दोनशे रुपये प्रति टन मागत आहे मजुराला प्रति टन 700/800 रुपये द्यावे लागतात व कारखाना देतो 1400 व 1600 रुपये हप्ता... तोडणी अभावी उभा राहीलेल्या उस उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे... प्रतिनिधी हरीदास तावरेंचा ग्राऊंड रिपोर्ट...

आम्ही शेतात ऊस लावलाय आमची काय चूक झाली का...?
X

बीड जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. याच बीड जिल्ह्यात गेल्या दोन वर्षापासून अतिवृष्टी थैमान घातलं. आणि याच पाण्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली. त्यामुळे ऊसतोड कामगारांच्या जिल्ह्यात उसाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यामध्ये जवळपास 25 ते 30 हजार हेक्टर ऊस शिल्लक राहण्याची चित्र दिसत आहे. जर काही दिवसात हार्वेस्टर सारखे यंत्र आणून जर उस शेताच्या बाहेर काढला नाही तर शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ याचा बीड जिल्ह्यात येईल. बीड जिल्ह्यात ऊस तोडणीसाठी मजूर मिळत नसल्यामुळे शेतकरी हा मोठा अडचणीत सापडला आहे.

शेतकरी मित्रांनो शेती करणे फार अवघड झालं आहे. शेतीमध्ये कोणतेही पीक घेण्यासाठी खूप मेहनत आणि खूप खर्च व अडचणी येतात मी शेतकरी म्हणून सांगत आहे की मी उसाचे दहा एकर क्षेत्र लागवड केली आहे. उसाच्या शेतीला नांगरट, मोगडा ,पाळी ,सरी काढणे ,बेणे आणने ,त्याची लागवड ,खुरपणी पासुन तोडणीपर्यंत त्याचा एकरी कमीत कमी 30 हजार रुपये खर्च करावा लागतो. तोडणीसाठी आलेल्या पिकाला कारखाना योग्य तो भाव देत नाही. मजूर पुरवत नाही. आपण मजूर लावून तोडणे केली मजूर येतात तोडणी करतात 700 रुपये टन 800 रुपये टन द्या म्हणतात, कारखाना भाव देतो 1400 रुपये 1600 रुपये नंतर हप्ता देऊ नंतर बिल काढत नाहीत लवकर... शेतकऱ्यांसाठी अत्यंत दुःखद गोष्ट आहे ही शेतकऱ्यांना करा व काय आणि पीक घ्यावं कोणतं मग कोणता पीक लागवड करा व शासन म्हणतंय ऊस लागवड करा तुमचा ऊस नेवू आमक करू तमक करू काही एक खरं नाही कोणत्या गोष्टीचं अक्षरशा खूप खूप शेतकऱ्यांना त्रास होत आहे. आज हा माझ्या शेतातील ऊस आहे चार दिवसापूर्वी मजुरांकडून तोडून घेतला आहे. चार दिवसांपासून वाळतोय शेतात मुजराच कुणी नातेवाईक एक्सपायर होत आहे. कुणाला काही अनेक अडचणी येतात पैसे देऊन सुद्धा वेळेला आपण घेतलेले पीक योग्य ते बाजारपेठेत वेळेला जात नाही.त्याचे टाइमिंग नुसार पैसे सुद्धा मिळत नाहीत. एवढी शेतकऱ्यांची बेजारी चालू आहे.

अत्यंत हाल आहेत. 700 रुपये टनाने तोडणीला मागतात आणि 3400/3500 रुपये क्विंटल खतं घ्या. आणि मजुराचे तर काही विचारायच नाही... लुटायला बसलेत सगळे... शासन सुद्धा शेतकऱ्यांकडे अतिशय दुर्लक्ष करत आहे. माझी कळकळीची विनंती आहे. जर तुम्ही शेतकऱ्याला सपोर्ट नाही केला. तर शेती ही एकदम पडीक होऊन जाईल... शेतकऱ्यांनी पीकवलं नाही तर तुम्ही खाणार काय...? तुमची उपजीविका भागवण्यासाठी शेतकरी सुखी आणि समाधानी झाला तरच तुमच्या लेकरांना खाऊ घालत आला तुमच्याजवळ पगारी जरी असल्या तरी पैसे असले तरी पण... शेतातून जर पीकलचं नाही तर विकत काय घेणार आणि खाणार काय...? असं बहीर हरिदास रामभाऊ म्हणाले.

त्यांनी पुढे सांगितले, आता माझे असे प्रांजळ आणि नम्रपणाने मत आहे. शासनाच्या दरबारी मागणी आहे. की शेतकऱ्यांकडे थोडंसं लक्ष द्या...? त्याच्या मालाला योग्य तो भाव द्या...? आणि त्यांचे जे दहा रुपये तुम्ही देतात ते योग्य वेळेला द्या... अशीच माझी कळकळीची विनंती आहे....शासनाने असं लक्ष घालावे कि ज्यावेळेस इलेक्शन येथे मतदान येथे वेळेला. तुम्ही खेड्यापाड्यात गावात येतात. तुमचे प्रतिनिधी पाठवतात तुम्ही स्वतः गावात येतात इलेक्शन झाल्याच्या नंतर मतदान घेऊन तुम्ही सत्तेत बसता किंवा अपक्ष राहता... त्यावेळेस तुम्ही मतदानाच्या वेळेस विचारायला येत आहात तसे तुम्ही याना तुमचे प्रतिनिधी पाठवा शेतकऱ्याच्या काही अडचणी आहेत का...? त्याचा ऊस गेलाय का त्यांचं कोणतं पीक उभा आहे का... त्याला काही अडचणी आहेत का... याच्यासाठी कोणी का पाठवत नाहीत आता आमचे असे सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे की जर आपल्यातले नेते आपला असो किंवा परका असो मत मागायला आला की त्याला विचारायचं बाबा तू आज आला मत मागायला आमचे एवढे चार महिने हाल झाले आहेत तू त्यावेळेस कुठे गेला होता तू त्यावेळेस का आला नाहीस तू आता आम्हाला असं लेखी दे की मी जसं मत मागायला आलो आहे तसं पाचही वर्ष समस्या जाणून घ्यायला येईल... तरच मला मत द्या नाहीतर मला मतदान देऊ नका तुम्ही ऐकून घ्या नसता आपल्याला कुणाचे ऐकून घ्यायची गरज नाही, असं बहिर हरिदास रामभाऊ यांनी स्पष्ट केलं.

शेतकरी पवार म्हणाले, आम्ही शेतात ऊस लावलाय आमची काय चूक झाली का...? सर्वसामान्य शेतकरी ऊस लावतो सर्वसामान्य शेतकऱ्यांचे किती हाल आहेत... शासनं म्हणतंय ऊस लावा पुढारी म्हणतात ऊस लावा. ऊस लावून बारा महिने होऊन गेलेत लहान लेकराच्या वरचं जपलं आहे. तोडणीच्या टायमाला आमच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. सर्व शेतकरी चिंतेमध्ये आहेत ऊस तोडून चार दिवस झाले वाळत आहे कुठलंही वाहन मिळत नाही...कुठला मुकादम दक्षता घ्यायना कुठला पुढारी दक्षता घ्यायणा याच्याकडून तुझा तो म्हणतो उद्या नेहु. त्याच्याकडे जा तो म्हणतो परवा नेहु कारखाना म्हणतो आणा पदर तोडुन आणा. शेतकऱ्यांचे सहाशे-सातशे रुपये मजुराला तोडणीसाठी जात आहेत. वाहन मालक पैसे मागत आहे. ड्रायव्हर पैसे मागत आहे. शेतकऱ्याचे अशी हाल झालेत कोणीही दक्षता घ्यायला तयार नाही .कारखाना म्हणतो तुम्ही घेऊन या... नेहून घातल्यानंतर कारखाना टायमाला पैसे देत नाही .

मजूर थांबत नाही मजुराला पैसे द्यायचे म्हटले की आम्हाला एखाद्या सावकारा कडूनच घ्यावे लागतात. बँकेकडे गेलं तर बँक कर्ज देत नाही वेळेला मागची थकबाकी आहे तुमची नेमकं आम्ही करायचं काय... कुणापाशी जाऊन रडायचं... कोणाची भेट घ्यायची... सर्वांनी शेतकऱ्यांचे हाल करायचे ठरवले आहेत का... पुढाऱ्यांनी व कारखान्यांनी... आम्ही कुठलं पिक घ्यायचं या वर्षी कापूस नव्हता कापसाला भाव दिला त्यावेळेस शेतकऱ्यांकडे मला असेल त्यावेळेस त्याला भाव देत नाहीत नेमकं करायचं काय? आम्ही कोणतं पीक लावावे खजुरा कड गेला तर मजूर पाचशे रुपये रोज मागत आहे मजूर येत आहे 11 वाजता व 5 वाजता जात आहे शनिवारीच पैसे मागायला येतात कधी सोमवारी बाजार असतो.. आजाराच्या आदल्या दिवशी शेतकऱ्यांच्या दारात मंजूर येऊन थांबते आम्ही करायचं तरी काय आमची कुणी दक्षता घेत नाही.. असं पवार म्हणाले.

माझा ऊस तोडणी करून चार-पाच दिवस झाले आहे. पाऊस जाण्यासाठी मी इतका परेशान आहे. पहिला ऊस लावल्यानंतर उगवला त्यानंतर ऊस मोठा झाला त्याला तुरा आला तूरा ही गळाला त्याच ऊसाला दुसरा ऊसही फुटला आहे. तोडणी केल्यापासून पाच दिवस झाले आहे . त्याचे वजन घटले आहे की नाही... आम्ही पुढाऱ्यांकडून जात आहोत कारखान्याकडे जात आहोत कारखान्याच्या एम डी ला भेटतो. कर्मचाऱ्याला भेटतात ते म्हणतात उद्या पाठवतो टोळी परवा पाठवतो टोळी नेमकं आम्ही करायचं काय... मी आत्ता उसामध्ये उभा आहे माझी आत्महत्या करण्याची माझ्यावर वेळ आली आहे... हा ऊस चुलीला ही घालता येत नाही व जनावरं याला खात नाही नेमकं करायचं काय आम्ही आत्महत्या करायची पाळी आली आहे आमच्यावर काय हाल आहेत उसाचे माझ्या... आम्हाला कोणी वाली आहे का नाही...

आमची नेत्यांना मागणी आहे की राहिलेल्या पंधरा दिवसांमध्ये आमचा ऊस घेऊन जावा. जेणेकरून आम्हाला पुढील पिकाचे नियोजन करायला याच्यामध्ये आहे तो उस ठेवावा का कापूस लावावा सोयाबीन पेराव... का आहेत हे ऊस मोडाव्यात मार्केट मध्ये गेले तर 3 हजार रुपये क्विंटल खत आहे 500 रुपये रोज मजूर घेत आहे 300 रूपये महिला घेत आहेत ट्रॅक्टर जर लावायचं म्हटलं तर अडीच हजार रुपये एकर तीन हजार रुपये एकर...डिझेल झालं आहे 105 रुपये लिटर नेमकं करायचं काय आम्ही आम्हाला कोणी वाली आहे की नाह असं पवार म्हणाले.

माझ्याकडे स्वतः 20 एकर ऊस आहे. मजुराला पैसे दिल्याशिवाय मजूर ऊस तोडतंच नाही... वाहन मालकाला वाहतूक दिल्याशिवाय ट्रक मालकाला दोनशे रुपये प्रति टन द्यावे लागतात... ऊस तोडणाऱ्याला प्रतिटन दोनशे रुपये द्यावे लागतात... शेतकऱ्याला काय करत आहे एवढे शेतकर्याचे हाल आहेत एक खताचे पोते 10: 26: 26 चे 1800 रूपये द्यावे लागतात. एक टन ऊस 1500 रुपयात चालला व इतर त्याचा खर्च पकडला तर त्याला फक्त 800 रुपये त्याने पैसे शिल्लक राहत आहेत. एवढे बेकार हाल शेतकऱ्यांचे आहेत शेतकरी तरी कुणाकुणाला तोंड देणार आहे पुढारी तर सांगतात की आम्ही तुमचा ऊस घेऊन जाऊ .आम्हाला मतदान करा.आम्ही तुम्हाला कोणतीही अडचण येऊ देणार नाही... आणि शेतकऱ्या पाशी वेळेला कोणीच नाही... वेळप्रसंगी शेतकऱ्याला स्वतःलाच लढावे लागत आहे शेतकऱ्यांकडे कोणी येत नाही जात नाही... लेबर आता येत नाही 41 डिग्री सेल्सिअस तापमान झाले आहे आम्हाला पण जीव आहे असंच मजूर म्हणत आहेत या वर्षी काही ना काही ऊस शिल्लक राहणार आहे...

हा ऊस शिल्लक राहणार आहे जून एक महिन्यावर येऊन ठेपला आहे. जर हा ऊस शिल्लक राहिला तर याला काडी लावून द्यायची म्हटलं तर आम्हीच आम्हाला काडी लावल्यासारखं वाटत आहे. जून च्या नंतर तुम्ही कारखानदार हा उस पुढच्या वर्षी लवकर घेऊन जाणार नाहीत. या उशाला जर काडी लावायची पाळी आली तर आम्हीच आमच्या जीवाला काडी लावल्यासारखं होतयं... कारखानदार सांगतो आम्ही नेऊ आमदार सांगतो आम्ही नेहू जिल्हा परिषद मेंबर सांगतो आम्ही नेहू सरपंच म्हणतो मी येतो त्या कारखान्यापर्यंत कोणीही कुठे येत जात नाही ऊस जर शिल्लक राहिला तर शेतकऱ्याला आत्महत्या केल्या शिवाय पर्याय नाही... जरी ऊसाला काडी लावली तरी तो तोडून बांधावर टाकावा लागेल उसाला काडी लावली तरी त्याला खरच आहे .कारण तो लेबर तोडून बांधावर टाकावा लागेल लेबर ला पाचशे रुपये हजेरी झाली आहे .आणि काडी लावून नाही हा ऊस जाणार नाही त्याला पैसे लागणार आहेत शेत असं रिकाम होत नाही. कारखानदारांनी ज्या ठिकाणचे हार्वेस्टर रिकामे झाले आहेत ते जर पाठवले तर या ठिकाणचा उस जाईल जर कर्म कारखानदारांनी हार्वेस्टर पाठवले तर जिल्ह्यातील ऊस काही प्रमाणात जाईल अर्ध्या ला अर्धी देण्याची वेळ आली आहे .आमच्यावर लेबरला पाचशे रुपये देऊन सुद्धा लेबर मिळत नाही उन्हाची तीव्रता वाढली आहे त्यामुळे मजूर म्हणत आहे तुम्ही तुमचे पाहून घ्या असं बाळासाहेब लक्ष्मण बहिर म्हणाले.

जिल्ह्यातील अतिरिक्त उसाच्या गाळपाचे नियोजन करण्यात महसूल सहकार साखर कारखान्याचे प्रशासन पूर्णतः अपयशी ठरलेले आहे. अशा परिस्थिती मध्ये जिल्ह्यामध्ये 25 लाख मेट्रिक टन ऊस शिल्लक आहे .या ऊस गाळपाच्या नियोजनासाठी राज्यामध्ये एक बैठक झाली या बैठकीला अनेक मान्यवर हजर होते .राज्य सरकारने जे कारखाने बंद झाले आहेत त्या कारखान्याचे हार्वेस्टर ज्या ठिकाणी ऊस शिल्लक आहे अशा ठिकाणी पाठवण्याचे नियोजन केलेलं आहे परंतु हे जे हार्वेस्टर आहेत. त्या हार्वेस्टर वाल्यांनी शेतकऱ्यांची पिळवणूक करू नये सरकारकडे काही कारखानदारांनी एक प्रस्ताव दिला आहे .उसाची वाहतूक व साखर उतारा घटला आहे त्याला अनुदान पाहिजे ऊस वाहतुकीला अनुदान पाहिजे .आमची सुद्धा एक स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे, की नोव्हेंबर महिन्याची जी नोंद आहे ती उशीराने गाळप होत आहे, या उशिरा जाणाऱ्या ऊसाला अनुदान द्यावे कारण या शेतकऱ्याचा ही उतारा घटला आहे. कारखान्याचे नुकसान होत आहे तसं शेतकऱ्यांचाही नुकसान झालं आहे .याची काळजी सरकारने घ्यावी व ऊस शिल्लक राहणार नाही. याची सुद्धा काळजी सरकारने घ्यावी यंत्राने ऊस तोडताना शेतकऱ्यांची लूटमार करू नये एवढीच अपेक्षा.. असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुलदीप करपे म्हणाले.

बीड जिल्ह्यामध्ये उसाच्या संदर्भांमध्ये एवढं विदारक चित्र निर्माण झालं आहे की जवळपास 20 हजार हेक्‍टर ऊस शेतामध्ये उभा आहे. खाना दार मात्र आपल्या जवळच्या कार्यकर्त्याचा व आपापल्या जवळच्या माणसाचा उस नेत आहेत एकतर शेतकऱ्याकडे अडचण अशी निर्माण झालेली आहे. पेरण्या जवळ आल्या आहेत ऊस तोडणी मजूर हे आपली शेती करण्यासाठी आपल्या गावी गेले आहेत. त्यामुळे ऊसतोडणीसाठी मजूर मिळत नाही .उपमुख्यमंत्री यांनी बैठकीमध्ये सांगितलं होतं की जे कारखाने बंद झाले आहेत त्या कारखान्याचे हार्वेस्टर बीड जिल्ह्यात आम्ही पाठवू मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी शेतकऱ्यांसाठी कुठलाही अजून पर्यंत प्रयत्न केलेला नाही .जर बीड जिल्ह्यात हार्वेस्टर सारखं यंत्र ऊस कापणीसाठी आलं नाही तर हजारो हेक्टर ऊस शेतकऱ्यांच्या बांधावर टाकायची वेळ येणार आहे. माझी शासनाला व कारखानदारांना एवढीच विनंती आहे की जे होईल ते होईल जो ऊस शिल्लक राहील त्याला हेक्टरी शेतकऱ्याला एक लाख रुपये मदत कारखानदारांनी व शासनाने द्यावे, अशी आमची शेतकरी कामगार पक्षाची मागणी आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालक मंत्री यांना जिल्ह्यातील ऊस नेण्यासाठी अपयश आले आहे त्यामुळेच शेतकऱ्यांचा ऊस हा शेतात उभा आहे असं शेतकरी कामगार पक्षाचे मोहन गुंड म्हणाले.

Updated : 24 May 2022 7:55 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top