Home > मॅक्स रिपोर्ट > स्वाइन फ्लू चा वाढता कहर मात्र डॉक्टरांचे दुर्लक्ष

स्वाइन फ्लू चा वाढता कहर मात्र डॉक्टरांचे दुर्लक्ष

स्वाइन फ्लू चा वाढता कहर मात्र डॉक्टरांचे दुर्लक्ष
X

राज्यात स्वाइन फ्लू वाढत असून खुद्द डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांमध्येच उदासीनता दिसून येत आहे. यामध्ये राज्य सरकारकडून १ जानेवारी ते ११ ऑक्टोबरपर्यंत १ लाख २८ हजार २६ जणांना लस देण्यात आली. मात्र डॉक्टरांसह विविध रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे रुग्णानां गरजेची असलेली सेवा कमी पडत आहे. स्वाइनची साथ बळावण्याचा कालावधी हा पावसाळ्यादरम्यानचा असल्यामुळे अनेकदा ही लस एप्रिल किंवा मे महिन्यात दिली जाते. लसीकरण झाल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती तीन महिन्यांचा कालावधी नंतर वाढू लागतो. राज्यात लसीकरण हे प्रामुख्याने तीन टप्प्यांत केले जाते. मात्र लस घेण्याच्या दृष्टीने अधिक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. राज्याच्या साथ रोग विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी एन्फुएंजा ए एच १ एन १ प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राज्यातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणांकडून ऑसेलटॅमीवीर औषधे पुरवण्यात येत आहेत.

Updated : 13 Oct 2018 1:06 PM IST
Next Story
Share it
Top