Home > मॅक्स रिपोर्ट > बीड जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात, सिझरिंग न करत महिन्यात केल्या पाचशे प्रसूत्या
बीड जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात, सिझरिंग न करत महिन्यात केल्या पाचशे प्रसूत्या
Max Maharashtra | 2 Sept 2018 2:18 PM IST
X
X
बीड : माणसाचं आरोग्य उत्तम असेल तर तो कोणताही काम उत्तमरीत्या पार पाडू शकतो, अन्यथा तो कोणतचं काम व्यवस्थितरीत्या करू शकत नाही.
पूर्वी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातून महिलांना प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवल्या जायचं . प्रसूतीसाठी 'रेफर' हा जणू काही पॅटर्नच जिल्ह्यात झाला होता . हा रेफर पॅटर्न बंद करत , जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्या नियोजनातून , जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात एका महिन्यात तब्बल 500 प्रसूत्या सिझरिंग न करता करण्यात आल्या आहेत.यामुळं बीड जिल्ह्यातील खासगी रूग्णालयात सिझरच्या नावाखाली रूग्णांची होणारी लुट कमी होतांना दिसून येत आहे.
विशेष म्हणजे प्रसूती दरम्यान ज्या महिलेचं सिझर होतं, त्या महिलेला खूप पत्य तर पाळावीचं लागतात. याउलट पत्य पाळून देखील सिझर हे आयुष्य भराचा आजार देखील होऊन जातो. सिझरमुळे अनेक शारीरिक आजारांना खतपाणी मिळते.
बीड जिल्हा हा मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळं येथील ग्रामीण भागातील लोक हे प्रामुख्याने शेतीवर आणि मजुरीवर अवलंबून आहेत . त्यामुळं जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांना शेती पाहणे, शेतात मजुरी करने, ऊसतोडीवर काम करणे हे नित्याचेच आहे. यांतच ज्या महिलेचं सिझर झालेले आहे, त्या काम करतांना अनेक शारीरिक आजारांना सामोर जावं लागतं. हाच महिलांना होणारा त्रास कुठंतरी बंद झाला पाहिले. या हेतूने बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी, प्रसूतीसाठीचा रेफर पॅटर्न बंद करत,रुग्णांचे आर्थिक संकट कमी करत, ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयात सिझरिंग न करता प्रसूती असाच जणू काही पॅटर्न सुरू केला आहे. गत ऑगस्ट महिन्यात तब्बल 500 प्रसूत्या ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयात करून रुग्णांना दिलासा दिला आहे.
Updated : 2 Sept 2018 2:18 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire