औरंगाबादच्या रस्त्यांवर का फिरतोय चार्ली चॅपलीन?
कोरोनाची भिती अजूनही कायम आहे, तरीही लोक मास्क घालत नाहीये, अनेकदा आवाहन केले, अगदी महापालिकेनं दंडही ठोठावला तरीही अनेक औरंगाबादकर ऐकत नाहीयेत. अशा नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी औरंगाबादच्या रस्त्यावर उतरलाय, चार्ली चँप्लीन... काय करतोय नक्की चार्ली पाहूयात मॅक्स महाराष्ट्राचा हा स्पेशल रिपोर्ट
X
औरंगाबादकरांनी कोरोनाचं संकट त्यांनी गांभीर्याने घ्यावे म्हणून आता औरंगाबादच्या रस्त्यावर चार्ली चँप्लीन उतरलाय.. मास्क न घातलेला माणूस रस्त्यावर दिसला की हा थेट त्याच्यासमोर जातो आणि त्याला हात जोडून विनंती करतोय...कुणाच्या पायाही पडतोय, एखाद्यानं नाहीच ऐकलं तर तुझ्या नावाचा मास्क मी लावतो असं सांगत स्वत:च्याच चेह-यावर मास्कवर मास्क चढवतो.... काही लोक लाजेने तर काही कँमेरा पाहून मास्क लावत होते.. तर काहींना काहीच फरक पडत नव्हता, अगदी लहानग्यांना गाडीवर नेतांना त्यांना सुद्धा पालक मास्क घालत नाही, हे दुर्दैवी चित्र पहायला मिळतंय. बाजारपेठा, महत्वाचे रस्ते अगदी दुकानात, गल्ल्यांमध्ये फिरत तो जनगागृती करतोय.. लोकांनी मास्क लावावा इतकंच त्यांच म्हणणं आहे.
महापालिकेनं मास्क न लावणाऱ्या लोकांवर कारवाईसाठी पथकं तयार केली आहेत. मात्र नागरिक जुमानत नाहीत, महापालिकेनं आतापर्यंत 50 लाखांपेक्षा जास्त दंडसुद्द्धा वसूल केलाय असला तरी लोकांना भिती वाटत नाहीये. कोरोनाचे संकट संपले आहे या अविभार्वात लोक फिरत असतांना आता पुन्हा दिवसाला शहरात 100 नवे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळं आता तरी कोरोना गंभीरतेने घ्यावा आणि चार्लीच्या या आवाहनाला प्रतिसाद द्यावा हीच अपेक्षा.