कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती, रायगडमध्ये लहान मुलांसाठी अद्यायावत ICU तयार...
X
रायगड : देशात कोरोना रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहेत. बऱ्याच रूग्णालयांमध्ये बेडस्, ऑक्सिजन आणि वैद्यकिय सुविधांची कमतरता जाणवत आहे. कोरोना रूग्णांच्या मदतीसाठी एक पाऊल पुढे येत शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून एक अद्ययावत ICU युनिट तयार करण्यात आले आहे. एक कोटी रुपयांचे १५ बेडचे अद्ययावत आयसीयू युनिट जिल्हा सामान्य रुग्णालयास लोकार्पण करण्यात आले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि तज्ज्ञांच्या मते तिसरी लाट येण्याची दाट शक्यता लक्षात घेता आपण हे युनिट कायम स्वरूपी जिल्हा सामान्य रुग्णालयास सुपूर्द केले आले, असे शेकापच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.
आयसीयु बेडसोबत देण्यात आलेल्या वैद्यकीय साहित्यात एका पोर्टेबल एक्स रे मशीनचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालयात अशा प्रकारची मशीन उपलब्ध नव्हती. त्यामुळे या मशीनचा रुग्णांना मोठ्या प्रमाणावर लाभ होईल. तसेच एक्स रे काढण्यासाठी रुग्णांना हलविण्याची गरज पडणार नाही, असे नगरसेविका चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.