मी मोकळी हवा घेण्यासाठी तिथं गेले होते - अमृता फडणवीस
X
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या बाबतीत सध्या सुरु असलेल्या सेल्फीच्या वादावर त्यांनी माफी मागितली आहे. त्यांनी एका वृत्तवाहीनीला हि प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई-गोवा क्रूझ सेवेच्या उद्धाटनावेळी अमृता फडणवीस यांनी त्या क्रूझच्या टोकाला बसून सेल्फी काढला. त्यांच्या या सेल्फी काढण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला व अमृता फडणवीस यांच्यावर टिकेचे सुर उमटू लागले. आता त्यांनी या सेल्फिबाबत स्पष्टीकरण दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सेल्फीच्या वादावरून माफी मागितली आहे. टिव्ही 9 या वृत्तवाहीनीला त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई-गोवा क्रूझ सेवेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी क्रूझच्या टोकाला बसून अमृता फडणवीस यांनी सेल्फी काढला होता. त्यांचा सेल्फी काढण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. मात्र त्यांनी या सेल्फीबद्दल स्पष्टीकरण दिलेलं आहे.