Home > मॅक्स रिपोर्ट > बीड पुरती का होईना मी गृह मंत्री - पंकजा मुंडे

बीड पुरती का होईना मी गृह मंत्री - पंकजा मुंडे

बीड पुरती का होईना मी गृह मंत्री - पंकजा मुंडे
X

काल झालेल्या पाच राज्यातील निवडणुकाचे निकाल हें चार टाईम आम्ही सत्तेत होतो तेव्हाचे आहेत महाराष्ट्रात आम्ही चार वेळा सत्ता भोगून नंतर बघू, लोकसभेत आम्ही दणदणीत विजय मिळवू पंतप्रधान आमचाच असेल, ईतर राज्यांत आम्ही सत्तेत येवू हा विश्वास व्यक्त करत महाराष्ट्रात मुख्यमंत्री देखील भाजपचा असे प्रतिपदान राज्याच्या ग्रामविकास मंत्री ना पंकजा मुंडे यांनी केलें, या वेळी व्यासपीठावर जलसंधारण मंत्री.ना राम शिंदे, दुग्ध व पशू संवर्धन मंत्री ना महादेव जानकर यांची उपस्थिती होती. परळी येथील गोपीनाथ गडावरील स्व लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

यावेळी पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या कीं गँगवॉर संपून महाराष्ट्रात सुरक्षा काय असते तें मुंडे साहेबांनी ग्रहमंत्री असतांना दाखवून दिले तसे बीड जिल्ह्यातील गँगवॉर बंद करण्याचं काम मी केलं आहें.बीड जिल्ह्य़ापूर्ती का होईना मी गृह मंत्री आहें,असें वक्तव्य राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले,

तसेच जिल्हय़ातील प्रत्येक माणूस ठठ्णित असावा म्हणून हा कार्यक्रम घेतं आहें.मुंडे साहेबांच्या आठवणी काळा प्रमाणे गडद होतं आहे, बीड जिल्ह्यातील दुष्काळी लोकांना सेवा द्यावी म्हणून हा आरोग्य यज्ञ आम्ही घेतं आहोत, मोफत औषध, ऑपरेशन,आणि रोगनिदानचा लाभसामान्य लोकांना मिळणार आहें, सरकरी यंत्रणा आणि खासगी डॉक्टर्स यांनी सहभाग नोंदवला आहें.हें आरोग्य शिबीर नसून हा यज्ञ आहें, यात औषध अम्बूल्नस , डॉक्टर्स, हा समाज सेवेच्या यज्ञात आहुती देत आहेत प्रत्येकांनी आहुती दिली तर हा यज्ञ सफल होईल, असें पंकजा मुंडे यांनी सांगितले.

लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त परळी येथील गोपीनाथ गडावर महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती ना.महादेव जानकर- पशु व दुग्ध विकास मंत्री, जलसंपदा मंत्री ना.प्रा.राम शिंदे, यांची उपस्थिती हाेती. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त गोपीनाथ गडावर दोन दिवशीय महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहें. यात ऊसतोड मजूर, गरजू शेतकरी यांची आरोग्य तपासनी केली जात आहें.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/2127808037470284/

Updated : 12 Dec 2018 6:28 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top