‘साहेब, दहा हजारांत संसार कसा उभा करायचा?’
Max Maharashtra | 18 Aug 2019 2:02 PM IST
X
X
कोल्हापूर-सांगली भागात आलेल्या पुरात कित्येक लोकांची घरं उध्वस्त झालीयत. त्यांच्यासाठी नुकसानभरपाई म्हणून राज्य शासनाने प्रत्येक कुटूंबासाठी १० हजार रुपयांची मदत जाहीर केलीय. मात्र, कोल्हापुरच्या नरसोबाची वाडी गावात काही कुटुंबांना केवळ ५ हजारांची मदत मिळाली आहे. त्यामुळं नागरिकांमध्ये संभ्रम आहे. कुटूंबामध्ये ६ आणि ८ सदस्य आहेत. अशावेळी १० हजार रुपयांमध्ये संसार कसा उभा करणार असा प्रश्न पूरग्रस्तांना पडलाय.
या गावात पूरस्थिती निर्माण झाल्यावर अनेक पूरबाधितांची शिरोळमधील शाळेमध्ये राहण्याची सोय करण्यात आली होती. मात्र आजपासून गावांमधील पाणी कमी झाल्यामुळे नागरिकांनी आज स्वतःच्या घराकडे ओढ घेतली. अनेक नागरिकांनी आपली घर स्वच्छ केली मात्र घरामधील सर्व साहित्य पूराच्या पाण्यामध्ये वाहुन गेलं आहे. पुरग्रस्तांना सरकारकडून काही कुटुंबातील लोकांना केवळ ५ हजार रुपयांची मदत मिळालेली आहे असे काही लोक बोलत होते तर काही लोक काहीच मदत मिळाली नाही असंही गावकऱ्यांनी सांगितलं. काही वस्त्यांमध्ये अजूनही पाणी आहे, लोकांनी आपली घरं स्वच्छ केली आहेत. मात्र आजूबाजूच्या परिसरामध्ये अजून देखील अस्वच्छता आहे. दुर्गंधी पसरली आहे.
यावर्षीच्या सरकारचं कोणी इकडे आलंच नाही, फक्त एकनाथ शिंदे येऊन गेलेले आहेत. मात्र २००५ साली आलेल्या पूरावेळी आर. आर. पाटील, सोनिया गांधी, शरद पवार, मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी भेट देऊन मदत केली. मात्र यावेळी सरकारपैकी कोणीचं आलं नाही. अशी खंत कोल्हापूर जिल्हातील नरसोबाची वाडी मधील नागरिक करताना दिसत आहे.
Updated : 18 Aug 2019 2:02 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire