अहमदनगरचे भाजप उमेदवार सुजय विखे पाटील यांची संपत्ती किती?
Max Maharashtra | 2 April 2019 12:26 PM GMT
X
X
विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुलाने आज भाजपच्या वतीने नुकताच अर्ज दाखल केला. डॉ. सुजय विखे यांनी आपल्या अर्जात सादर केलेल्या संपत्तीत त्यांनी त्यांची पत्नी व त्यांच्या संपत्तीचे वर्णन केले आहे. डॉ. सुजय राधाकृष्ण विखे हे 11 कोटी 17 लाखांचे मालक आहेत, तर त्यांच्या पत्नी धनश्री या 5 कोटी 7 लाखांच्या मालकीण आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात सुजय विखे यांच्या संपत्तीचा उल्लेख करण्यात आला आहे. विखे यांचे नाव शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये नोंदवले गेले असल्याचे प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे.
सुजय विखेंवर कर्ज किती?
डॉ. सुजय विखे यांच्यावर कोणतेही कर्ज नाही.
पत्नीकडे किती कर्ज?
पत्नीकडे बँकेचे 26 लाख 23 हजारांचे कर्ज आहे.
Updated : 2 April 2019 12:26 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire