दहा दिवसांच्या उपोषणानंतर अन्यायग्रस्तांची दखल
घरं जाळून बेघर केलेल्या हिंगोलीवासीयांना अखेर दहा दिवसांच्या उपोषणानंतर न्याय मिळाला आहे. दोषींवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून आता न्यायालयातून जमीनीचा हक्क मिळणार आहे.
X
हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या दहा दिवसांपासून उपोषणाला बसलेले हे सगळे हामालवाडी हिंगोली येथील रहिवासी होते. 1970 पासून ते ज्या जागेवर राहत होते त्या जागी त्यांच्या पस्तीस झोपड्या जाळण्यात आल्या आहेत. याबाबत स्थानिक प्रशासनाकडे तक्रार देऊनही कोणी दखल घेतली नव्हती. सगळ्यात गंभीर बाब म्हणजे त्यांच्या झोपड्या जाळल्या जात असताना पोलिस तिथे समोर उभे होते पण त्यांनी काहीच केले नाही असल्याचा आरोप या महिलानी केला होता.
अनेक वर्षापासून एका घरात राहत असताना बेघर होण हे खूप भीतीदायक असत. त्यात ही मंडळी हमाल मोलमजुरी करून जगणारे गरीब. धनशक्तीच्या विरोधात कुठून आणि कसे लढणार ? असा प्रश्न होता.
शेख बाबुशेठ बाबा, प्रकाश नामदेव चंदनशिवे, वच्छलाबाई चंदनशिवे यांच्यासारखे 50 ते 60 लोक बेघर आहेत. प्रशासन त्यांच्याकडे लक्ष देत नसल्याने लोकशाहीमध्ये असलेल्या उपोषणाच्या प्रमुखास अस्त्रासह आपलं घर वाचवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसल्यानंतर दहाव्या दिवशी दोषींवर गुन्हे दाखल झाले आहेत.