Home > मॅक्स रिपोर्ट > गावातील यात्रा उत्सवानिमित्त हिंदू-मुस्लिम बांधवांचे एकतेचे प्रतीक

गावातील यात्रा उत्सवानिमित्त हिंदू-मुस्लिम बांधवांचे एकतेचे प्रतीक

गावातील यात्रा उत्सवानिमित्त हिंदू-मुस्लिम बांधवांचे एकतेचे प्रतीक
X

राज्यातील राजकारणी हनुमान चालीसा अन भोंग्यात अडकून पडलेत. कुणी हनुमान चालीसाचे राजकारण करत आहेत तर कुणी भोंग्याचं राजकारण करतंय. यामुळं राज्यातील वातावरण ढवळून निघालंय. मात्र दुसरीकडे या सर्व गोष्टीला खतपाणी न घालता, बीडमधील गावखेड्यातील हिंदू-मुस्लिम बांधव एकत्र येत, अनोखा यात्रा उत्सव साजरा करत आहेत. गावातून भगवी अन पांढरी पताका मिरवणूक काढत, एक हनुमंताला तर दुसरी मौलवी बाबाला अर्पण करतायत. पाहुयात राज्यातील राजकारण्यांनी डोळ्यात झणझणीत अंजन घालावं, असं गावखेड्यातील चित्र दाखवणारा मॅक्स महाराष्ट्रचा स्पेशल रिपोर्ट...





हे आहे बीडच्या आष्टी तालुक्यातील कडा गाव..या गावात जसं हनुमंताला पूजलं जातं, अगदी तसचं मौलवी बाबा दर्ग्याला देखील पूजले जाते. या गावात कोरोनाच्या 2 वर्षाच्या खंडानंतर यंदा मात्र, हिंदू मुस्लिम बांधवांच्या एकतेचे प्रतिक असणारा, मौलाली बाबा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात सुरु झाला आहे. प्रथम गावातील ग्रामपंचायत समोरून मिरवणूकीला सुरुवात होते. यावेळी एक भगवी पताका आणि दुसरी पांढरी पताका घेऊन, ही मिरवणूक काढली जाते. त्यानंतर भगवी पताका मारुती मंदिरात उभी करुन पुन्हा मिरवणूक सुरू होते. त्यांनतर मौलाली बाबा दर्ग्याला चादर चढवून पांढरी पतका उभी केली जाते. विशेष म्हणजे या मिरवणुकीत गावातील सर्व हिंदू- मुस्लिम बांधव एकत्र सहभागी होतात. आणि शेवटी सर्वांना गुळ, नारळ एकत्रीत करुण शेरणीचा महाप्रसाद वाटप करण्यात येतो.





कोरोनाच्या 2 वर्षांनंतर यात्रा होत आहे, आम्ही दरवर्षी खुप आनंद करतो. यंदा यात्रा सुरू आहे, खूप आनंद आहे. विशेष म्हणजे आम्ही सर्व हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येत हा उत्सव साजरा करतो. सुरुवातीला दोन ध्वज घेऊन मिरवणूक काढतो. पहिला ध्वज हा हनुमंताच्या मंदिराला लावतो. त्यांनतर दुसरा ध्वज हा मौलवी बाबाच्या दर्ग्याला लावतो. त्यामुळं या गावात हिंदू मुस्लिम असा भेदभाव नाही. त्यामुळं सर्वजण हा। उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करतात. अशी प्रतिक्रिया गावातील ग्रामस्थांने दिलीय.





दरम्यान राज्यात हनुमान चालीसा अन भोंग्याचं राजकारण सुरुय. महत्वाचे अनेक नेते यामध्ये गुरफटून गेलेत. मात्र या सर्वांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालावा, असाच उत्सवरूपी संदेश बीडच्या कडा गावातील गावकऱ्यांनी दिलाय. त्यामुळं हे गावखेड्यातील चित्र पाहून आतातरी हे राजकारणी मंडळीचे डोळे उघडणार का ? आणि हनुमान चालीसा अन भोंगा सोडून गावखेड्यातील समस्या दिसणार का ? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे...

Updated : 18 May 2022 8:15 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top