Home > Election 2020 > अबकी बार 300 पार करत मोदी दुसऱ्यांदा सत्तेत

अबकी बार 300 पार करत मोदी दुसऱ्यांदा सत्तेत

अबकी बार 300 पार करत मोदी दुसऱ्यांदा सत्तेत
X

देशातील सर्व विरोधी पक्षांना धूळ चारत भाजपनं लोकसभा निवडणूकीत घवघवीत यश मिळवलंय. याआधी फक्त काँग्रेसला बहुमतासह पुन्हा सत्तेत येण्याची संधी मिळाली होती. मात्र, काँग्रेसशिवाय इतर पक्षाच सरकार बहुमतासह पुन्हा सत्तेत येण्याची ही भारतीय राजकारणातली पहिलीच वेळ आहे.

2014 मध्ये 282 जागा मिळवणाऱ्या भाजपसमोर यंदा काँग्रेससह विरोधकांनी आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केला होता. 2019 च्या निवडणुकांना सामोरं जातांना भाजपनं अब की बार 300 पार असा नारा दिला होता. त्याप्रमाणे भाजपनं 303 जागा जिंकत तो नारा खरा ठरवलाय. तर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला 348 जागापर्यंत मजल मारता आली आहे. 543 पैकी सर्वाधिक धक्कादायक निकाल उत्तरप्रदेशमधील अमेठी या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून आलाय. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना भाजपच्या स्मृती इराणी यांनी पराभूत केलंय. मात्र, केरळच्या वायनाडमधून राहुल गांधी विजयी झाले आहेत. पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांच्या नंतर सलग दुसऱ्यांदा बहुमताचं सरकार आणणारे नरेंद्र मोदी हे पहिलेच बिगरकॉँग्रेसी ठरले आहेत.

लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी संबंधित पक्षाला लोकसभेच्या एकूण जागांपैकी 10 टक्के जागा म्हणजेच 55 मिळणं अपेक्षित आहे. मात्र, काँग्रेसला 55 पेक्षा कमी जागा म्हणजे फक्त 52 जागा मिळाल्या आहेत, त्यामुळं यंदाही काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळणं कठीण झालंय. अजूनही सहा जागांचे निकाल आलेले नाहीत.

17 व्या लोकसभा निवडणुक निकालाची वैशिष्ट्ये

भाजप – 303 जागा

एनडीए – 348 जागा

काँग्रेस – 52

युपीए – 96 जागा

Updated : 24 May 2019 1:47 PM IST
Next Story
Share it
Top