कामाठीपुराच्या पुनर्विकासाची घोषणा अधिकृत आहे का?
X
मुंबई शहरातील कामाठीपुरातील अनेक वर्षांपासून स्थानिकांनी पुनर्विकासाची मागणी सरकारकडे केली होती. बी.डी.डी. चाळीप्रमाणे पाचशे स्केअर फुटची घरे मिळावीत, अशी मागाणी स्थानिक लोकांनी का केली? कामाठीपुराचा विकास करण्यासाठी कोणत्या अडचणींचा सामना स्थानिक नागरिकांना करावा लागेल? मुंबई महानगरपालिकेची निवडणुक डोळ्यांसमोर ठेवून पुनर्विकासाचा गाजर दाखवलं जातंय का? अश्या सर्व प्रश्नांचा मॅक्स महाराष्ट्रने वेध घेतला आहे
मुंबई शहरातील कामाठीपुरा येथे 2000 पेक्षा अधिक नागरिक राहतात. पण स्थानिकांनी गेल्या चार वर्षांपासून कामाठीपुराच्या पुनर्विकासासाठी मागणी केली होती. परंतु अलीकडेच शिंदे फडणवीस सरकारने कामाठीपुराच्या पुनर्विकासाची घोषणा केली. परंतु सरकारची पुनर्विकासाची घोषणा महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केली आहे का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. कामाठीपुराचा पुनर्विकासाच्या प्रकल्पासाठी टेंडर काढले नसतानाही शिंदे फडणवीस
सरकारने केलेली घोषणा ही अधिकृत आहे का? असा तेथील स्थानिकांना पडलेला प्रश्न आहे. माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जून 2022 मध्ये कामाठीपुराचा 15 दिवसात कायापालट करण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं. पण त्यांचं आश्वासन स्थानिकांना दिशाभूल करणार ठरलं. शिंदे फडणवीस सरकारकडे कामाठीपुरातील स्थानिकांनी बीडीडीच्या चाळीप्रमाणे पाचशे स्केअर फुट प्रमाणे घरी द्यावी अशी मागणी केली खरी, पण बीडीडी चाळीची जमीन ही शासकीय अख्याधारीत येत असल्याने कामाठीपुरातील काही जमिनाचा भाग शासकीय प्रकल्पात येत नाही. त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारने प्रकल्पातील अडचणी दूर करून स्थानिकांनी दिलेली आश्वासन पूर्ण करावं. असं स्थानिकांची मागणी आहे.