Home > मॅक्स रिपोर्ट > Ground Report : गरिबांच्या मुलांनी पुण्यात शिकायचे नाही का?

Ground Report : गरिबांच्या मुलांनी पुण्यात शिकायचे नाही का?

शिक्षणाची कास धरुन मुख्य प्रवाहात येण्यासाठी अनेक गरिब विद्यार्थी पुण्यात येतात. पण केवळ राहण्याचा आणि खाण्याचा खर्च परवडत नसल्याने त्यांना शिक्षण बंद पडण्याची भीती वाटते आहे, राजकीय डावपेचांच्या गदारोळात हरवलेले भीषण वास्तव मांडणारा गौरव मालक यांचा ग्राऊंड रिपोर्ट....

Ground Report : गरिबांच्या मुलांनी पुण्यात शिकायचे नाही का?
X

पुणे शहर हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखलं जातं. राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी पुणे येथे येतात. मात्र राज्याच्या विविध भागातून पुण्यात आलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर संघर्ष करावा लागत आहे. गुणवत्ता असताना देखील शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश मिळत नसल्याने या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. घरची परिस्थिती प्रतिकूल असल्याने पुणे येथे राहणे अडचणीचे ठरत आहे. पैसे नसल्यामुळे आम्ही केवळ एकवेळचे जेवण करतो, असे या विद्यार्थ्यांनी सांगितले आहे. तर दुसरीकडे वसतीगृह मिळत नसल्याने पालकांना शिक्षणाचा खर्च उचलणे शक्य नाही, त्यामुळे आमचं शिक्षण बंद होईल अशी भीती विद्यार्थिनींनी व्यक्त केली आहे. शिवाय रूम करून राहिल्यानंतर राहताना आणि प्रवास करताना असुरक्षित वाटत असल्याचे विद्यार्थिनींचे म्हणणे आहे.

स्वाधाय योजनेच्या धर्तीवर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र सक्षम योजना तयार करून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी या विद्यार्थी स्तरातून केली जात आहे. या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या समस्या जाणून घेण्यासाठी पुण्याच्या विविध भागात जाऊन थेट आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी...

Updated : 27 May 2022 7:41 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top