'पाकिस्तानातून माझ्या पतीचा मृतदेह आणून द्या'- पत्नीची सरकारकडे मागणी
Max Maharashtra | 9 April 2019 10:32 AM IST
X
X
पाकिस्तान आणि भारताचे संबंध तनावपूर्ण असताना पाकिस्तानात एका भारतीयाचा गेल्या महिन्यात मृत्यू झाला. भिखाभाई बामनिया असं मृत्यू झालेल्या मच्छिमाराचं नाव असून पाकिस्तानच्या हद्दीत शिरल्यानं पाकच्या नौदलानं 15 नोव्हेंबर 2017 ला बामनिया यांना ताब्यात घेतलं होतं. मात्र, पाकच्या कारागृहातच बामनिया यांचा गेल्या महिन्यात मृत्यू झाला आहे. 'माझ्या पतीचं 4 मार्चला पाकिस्तानच्या कारागृहात निधन झाल्याची माहिती मिळाली. त्याचं निधन होऊन आता एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. पण अद्यापपर्यंत पतीचं पार्थिव भारतात पाठवण्यात आलेलं नाही. 'पाकिस्तानातल्या कारागृहात मृत्यू झालेल्या माझ्या पतीचा मृतदेह ताब्यात द्यावा'
अशी मागणी गुजरातमधल्या बामनिया यांच्या पत्नी भानीबेन यांनी परराष्ट्र मंत्रालयाला केली आहे. बामनिया हे गिर सोमनाथ जिल्ह्यातील उना येथील पालदी गावातील रहिवासी होते. दरम्यान या प्रकरणात सुषमा स्वराज यांनी स्वत: लक्ष घालावं अशी विनंती बामनिया यांच्या पत्नीनं केली आहे.
Updated : 9 April 2019 10:32 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire