Home > मॅक्स रिपोर्ट > Ground Report : ई पीक पाहणी खरंच व्यवहार्य आहे का?

Ground Report : ई पीक पाहणी खरंच व्यवहार्य आहे का?

Ground Report :  ई पीक पाहणी खरंच व्यवहार्य आहे का?
X

राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या हिताचा दावा करत ई पीक पाहणी कार्यक्रम हाती घेतला आहे. मात्र यामध्ये शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत आहेत. ई पीक पाहणी योजना शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे दिसते आहे. शेतकरी आपल्या शेतातून स्मार्टफोनद्वारे ई पीक पेरा लावू शकतो, असे सरकारने सांगितले आहे.मात्र अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्ट फोनच नसल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.



बरं स्मार्ट फोन जरी असला तरी शेतांमध्ये रेंज मिळत नाही, एखाद्या शेतात रेंज मिळाली तरी मोबाईवर ई पीक पाहणी करतांना शेतकऱ्यांचे नाव, शेतीचा गट क्रमांक वेगळाच दाखवतो ह्या योजनेत अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्याने ई पीक पाहणी केली नसेल तर शेतकऱ्यांना इतर योजनांचा लाभ मिळणार नाही असे महसूल आणि कृषी प्रशासन सांगत आहे. यामुळे शेतकऱ्यांना ही योजना अडचणी ठरत आहे.



शेतकऱ्यांना नेमक्या कोणत्या अडचणींना सामोरे जाव लागत याचा आढावा घेतला आमचे सीनिअर करस्पाँडन्ट संतोष सोनवणे यांनी....

Updated : 23 Sept 2021 6:11 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top