'मोहा'त अडकलेल्या गडचिरोलीला 'लाडू' दिलासा
Max Maharashtra | 6 May 2019 5:22 PM IST
X
X
नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्हा हा मोहात अडकला असल्याने विकासातील मोठा अडथळा ठरतो आहे. मोहाच्या फुलांपासून तयार करण्य़ात येणारी दारू हे जसं उपजिविकेचं तसंच विनाशाचंही साधन ठरतंय.. या मोहातून मुक्तता करीत मोहापासून लाडू बनवण्याचा उपक्रम इथल्या बचतगटानं राबवलाय. या लाडूला चांगला प्रतिसाद मिळत असला तरी अद्याप पुरेशी मागणी नोंदवली जात नसल्याने बचतगटाचा प्रयत्न चालू आहे.
गडचिरोली जिल्हा अतिदुर्गम आणि नक्षल प्रभावित जिल्हा असून या जिल्ह्यात दारुबंदीही लागू आहे, असं असलं तरी मोहफुलापासून तयार करण्यात येणा-या घरगुती दारुचा वापर जिल्ह्यात अधिक प्रमाणात आहे. गडचिरोलीच्या एकुण क्षेत्रफळापैकी 76 टक्के क्षेत्र हे जंगलानं व्यापलेलं आहे. या वनात मोहाची झाडे मोठ्या प्रमाणात आढळतात. मार्च एप्रिल महिन्यात मोहफुले लगडतात. ती गोळा करुन विकणं हे अर्थार्जनाचं साधन आहे. बहुतांशी मोहफुले ही दारु तयार करण्य़ासाठी वापरली जात असल्यानं या भागात दारु पिण्याचं प्रमाण जास्त आहे. ओला मोहा 30 ते 35 रुपये किलो ने विकला जातो. छ्त्तीसगडमधील अनेक व्यापारी हा खरेदी करुन त्याचा साठा करतात आणि तुटवडा निर्माण झाला की हा वाळलेला मोहा 70 ते 80 रु किलोने विकला जातो.
या मोहातून नागरिकांची मुक्तता करून त्याचा सकारात्मक वापर करण्याचा विडा धानोरा येथील दिपज्योति लोकसंचालित साधन केंद्र अंतर्गत आदर्श महिला बचतगटाने उचललाय. मोहापासून त्यांनी लाडू तयार केले आहेत. त्यांनी बनवलेल्या या मोहा लाडुला वेगवेगळ्या प्रदर्शनांमध्ये अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. या बचतगटाने गडचिरोलीपासून मुंबईपर्यंतच्या विविध प्रदर्शनांमध्ये मोहा लाडू ठेवले होते. मुंबईकरांनी या मोहालाडुला चांगला प्रतिसाद दिल्याची आठवण अध्यक्ष निर्मला वाढणकर सांगत्तात.
अध्य़क्षा, आदर्श महिला बचत गट
मुंबईतील अनेकांनी या लाडूच्या विपणनासाठी आश्वासन दिले पण त्यानंतर कुणी पुढे आले नसल्याची खंत या महिला व्यक्त करतात. गडचिरोलीत कुपोषणाचे प्रमाण जास्त आहे असून कुपोषित बालकांसाठी हा लाडू उपयोगात येउ शकतो. निर्मला वाढणकर सांगतात सरकार स्तनदा मातांना देत असलेले पुडे त्यांच्यापर्यंत पोहचत नाहीत आणि ज्यांच्यापर्यंत पोहचतात ते आपल्या जनावरांना देतात. त्या ऐवजी सरकारने आमच्या मोहा लाडुचा पर्याय स्वीकारावा. या लाडूमुळे शुगर नियंत्रनात आणते, महीलांसाठी उपयुक्त, रक्त वाढण्यासाठी फायदेशीर, कुपोषन रोखण्यास लाभदायक असल्याचा दावा बचतगटानं केलाय.
सचिव, आदर्श महिला बचत गट
मोहापासून लाडू बनवण्याच्या या व्यवसायामुळे रोजगाराची समस्याही काही प्रमाणात कमी होईल. त्यासाठी सरकारने आंम्हाला बाजारपेठ उपलब्ध करुन द्यावी अशी बचतगटाची अपेक्षा आहे.
या लाडूत कोणते घटक आहेत.
प्रोटीन : 05.65 फॅट्स : 03.98 फायबर : 02.01 कॅलरीज : 352.0 कार्बोहायड्रेट 73.46 मॅग्नेशिअम : 48.00 झिंक :03.02आयर्न : 00.20 शुगर : 40.09 कॅल्शिअम : 22.00
कोणते जीवनसत्व मिळते
: ए आणि सी,
Updated : 6 May 2019 5:22 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire