फर्निचर विक्रेत्यांच्या विघ्न काही दूर हाेईना..!
लग्नसराईचा काळ म्हणजे फर्निचर विक्रेत्यांसाठी सुवर्णकाळ असतो,मात्र गेल्या दोन वर्षांपासून याच काळात कोरोनाचा उद्रेक वाढत असल्याने याचा फटका त्यांना बसला आहे. नेमक्या काय आहेत फर्निचर विक्रेत्यांच्या व्यथा पाहूया आमचे प्रतिनिधी मोसिन शेख यांचा हा स्पेशल रिपोर्ट..
X
औरंगाबाद: कोरोनाच्या पहिल्या लाटेतून सावरणाऱ्या अनेक छोटे मोठे व्यवसायिकांची आर्थिक परिस्थिती दुसऱ्या लाटेत डबघाईस आल्याचे पाहायला मिळत आहे.यातीलच एक म्हणजे फर्निचर विक्रते,एन लग्नसराईच्या काळातच कोरोनाचा उद्रेक वाढला,परिणामी लग्न समारंभाचे महत्वपूर्ण घटक असलेल्या सर्व व्यवसायिकांवर याचा विपरीत परिणाम झाला. आणि याचाच फटका फर्निचर विक्रेत्यांना सुद्धा बसला आहे.
औरंगाबादच्या विजय शेजुळ यांनी चार वर्षांपूर्वी बँकेचे कर्ज काढून फर्निचर दुकान सुरू केलं. सुरवातीला व्यवसाय चांगला चालला, लग्नसराईच्या काळात अपेक्षापेक्षा अधिक व्यवसाय होत होता. त्यामुळे दोन वर्ष चांगली गेली असल्याने त्यांनी गेल्या वर्षी लग्नसराईच्या पूर्वी उधारीवर दुकानात मोठ्याप्रमाणात माल भरला.
पण अचानक कोरोनाचा उद्रेक झाला आणि लग्नसराईवर बंदी आली. त्यात लॉकडाऊन लागल्याने दुकानेही बंद झाली.त्यामुळे शेजुळ हे मोठ्या अडचणीत सापडले आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतून सावरण्याचा प्रयत्न करतोय, मात्र आता पुन्हा जर तिसरी लाट आली तर आम्हाला रोजगार हमीच्या कामावर जावं लागेल, असं विजय शेजुळ म्हणतात.
वशेजुळ यांच्याप्रमाणेच इतर फर्निचर विक्रेत्यांची अवस्था आहे, दुकानात लाखोंचा माल पडून आहे, काही उधारीवर तर काही कर्ज काढून अनेलला आहे.मात्र ग्राहकच नसेल तर लोकांची उधारी कशी फेडावी असा प्रश्न त्यांना पडला आहे.
मोठं-मोठ्या वस्तूंनी भरलेले फर्निचर दुकानात दिसायला लाखोंचा माल असतो, त्यामुळे दुकानार सुद्धा मोठा व्यापारी असल्याचं अनेकांच समज असतो, पण कोरोनामुळे 'बडा घर पोकळ वासा' अशीच काही अवस्था फर्निचर विक्रेत्यांची झाली आहे.