2024मध्ये नरेंद्र मोदींना पराभूत करायचंय?
X
2019 च्या लोकसभा (loksabha) निवडणुकांनंतर राहुल गांधी (rahul gandhi)यांनी पक्षातील जुन्या नेत्यांवरील नाराजी व्यक्त करण्यासाठी काँग्रेसच्या (congress) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. लोकसभा निवडणुकांनंतर येणाऱ्या विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्येही काँग्रेसचा पराभव होईल आणि त्याची जबाबदार पक्षातील बुजूर्ग नेत्यांना घ्यावी लागेल असा राहुल गांधींचा कयास होता. भाजपला (BJP) 303 जागांसह मिळालेल्या प्रचंड मोठ्या मताधिक्यानंतर मोदी (narendra modi) आणि शाह जोडी हरयाणा, महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये जिंकणार असाच अंदाज व्यक्त केला जात होता. दिल्ली निवडणुकीत तर काँग्रेस पक्ष चर्चेतही नव्हता.
पण प्रत्यक्षात एखाद्या राज्याच्या निवडणुकीत काँग्रेसचा मोठा विजय झाला तर राहुल गांधी पुन्हा पक्षाध्यक्षपदी विराजमान होतील अशी परिस्थिती गेल्या काही महिन्यात आणि सध्या तरी दिसत नाहीये. राहुल गांधींना उपाध्यक्ष ते पक्षाचे अध्यक्ष होण्यासाठीही अशाच विजयाची प्रतिक्षा पाहावी लागली होती.
विधानसभा निवडणुकांनंतर झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चाच्या सरकारमध्ये काँग्रेसला महसूल खाते मिळाले. इकडे महाराष्ट्रात शरद पवारांनी काँग्रेस आणि शिवसेनेला (shiv sena) सोबत घेत सरकार स्थापन केले. राहुल गांधी कदाचित यामुळे नाराज असतील. हरयाणामध्ये काँग्रेसला अपेक्षेक्षा जास्त जागा मिळाल्या. राहुल गांधींनी निव़डलेला नेता आधीच बाजूला केला असता तर या निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला असता, हे काँग्रेसच्या त्या नेत्यांनी सिद्ध करुन दाखवले. जर राहुल गांधींनी राजीनामा दिला नसता तर या विजयांचे श्रेय घेऊन आपण राखेतून पुन्हा भरारी घेऊ शकतो हे त्यांना सांगता आले असते.
राज्यांच्या निवडणुकांमधले जय-पराजय तर सुरूच राहतील. पंतप्रधान मोदींसाठीदेखील ती एक डोकेदुखी आहे. म्हणूनच त्यांनी आपल्या नेहमीच्या लोकशाहीविरोधी मार्गाने ‘एक देश एक निवडणूक’ ही घोषणा देऊन टाकली आहे.
राज्य स्तरावरच्या निकालांबाबत नरेंद्र मोदींनी स्वत:ला पक्षापासून लांब ठेवण्यात यश मिळवले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधल्या निवडणुका नरेंद्र मोदींच्या भोवतीच लढल्या गेल्या. 2019च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी मोदींचे राष्ट्रीय दृष्टीकोनातून मूल्यमापन केले. पण लोकसभा निवडणुकांच्या आधी आणि नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काही राज्यांमध्ये वेगळा कौल दिला.
राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील राजकारण वेगळे करुन नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय पातळीवर आघाडीच्या राजकारणाचा विषय संपवून टाकला आहे. राहुल गांधी, काँग्रेस आणि जवळपास सर्वच विरोधकांनी विधानसभा निवडणुकांची फायनल म्हणजे लोकसभा असा चुकीचा समज करुन घेतला आहे. काँग्रेसने 2017मध्ये हिच चूक केली होती. राहुल गांधींनी कर्नाटकच्या निवडणुकीत सारी ताकद पणाला लावली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला की 2019च्या लोकसभा निवडणुकांपर्यंत पक्षाची ताकद वाढत जाईल असा त्यांचा अंदाज होता.
3 वर्षांची रणनीती
राष्ट्रीय पातळीवर विरोधकांनी पुढच्या 3 वर्षांसाठी म्हणजे 2021, 2022 आणि 2023 या तीन वर्षात वेगवेगळी कॅम्पेन उभी केली पाहिजे. यात सगळ्यात महत्त्वाचे आहे ते नियोजन.
नरेंद्र मोदी त्यांच्या कॅम्पेनचे नियोजन आधीच करतात. एका कॅम्पेनमधून दुसरे कॅम्पेन, यामुळे मोदींचे कँम्पेन कायम असतात. काँग्रेसलाही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याची गरज आहे. ऐनवेळी तयारीला लागण्याचे धोऱण सोडावे लागेल. काँग्रेसला अजेंडा ठरवण्यासाठी जानेवारी 2021 ते डिसेंबर 2023 या काळासाठी कॅम्पेनचे नियोजन करावे लागेल. या 3 वर्षांत लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्या कॅम्पेनची गरज आहे याचा अंदाज तर आता काँग्रेसला आलाच असेल.
राहुल गांधींनी यावरच लक्ष केंद्रीत केले पाहिजे. राज्यांचे राजकारण अहमद पटेल यांच्यावर सोडून द्यावे. पक्षांतर्गत वाद मिटवण्याचे काम प्रियंका गांधींवर सोपवून द्यावे. बेरोजगारी, घटता विकासदर आणि घटते उत्पन्न या समस्या पुढचा काही काळ महत्त्त्वाच्या ठरणार आहेत हे तर राहुल गांधी जाणतात. या मुद्द्यांभोवती वर्षभरासाठी कॅम्पेनचे नियोजन करता येईल. राज्यांच्या निवडणुका कुणीही जिंकले तरी हे मुद्दे कायम राहणार आहेत. उलट भविष्यात यामध्ये महागाईची भर पडणार आहे. उतावीळपणा न करता आणि मेहनीतेच फळ राज्यांच्या निवडणुकांमधून मिळेल ही अपेक्षा न ठेवता काम करावे लागेल. एक चाणाक्ष गुंतवणूकदार व्हा, दीर्घकाळासाठी गुंतवणूक करा आणि 3 वर्षांसाठी संयम ठेवा.
3 वर्षांची रणनीती कशी ठरवणार?
अगदी सोपे आहे. आधी तुमच्या जमेच्या बाजू, कमतरता, तुमच्या पुढच्या संधी आणि संभाव्य धोके यांची यादी तयार करा. त्यानंतर अभ्यासातून तयार केलेल्या मुद्द्यांची यादी करा. त्यात अगदी लहान लहान मुद्द्यांचाही समावेश करा. महत्त्वाचे मुद्दे कोणते यासाठी सर्वेक्षण गरजेचे आहे. यादी बनवल्यानंतर प्रत्येक मुद्द्याभोवती कॅम्पेन सुरू करा, मोदींच्या अविरत सुरू असलेल्या कॅम्पेनमागील ही रणनीती सूक्ष्म निरीक्षण केले तर जाणवते. प्रत्येक कॅम्पेनचा स्वतंत्र मुद्दा असतो. हिंदुत्व, राष्ट्रीयत्व ही त्यांची ताकद असल्याने त्यांचे कॅम्पेन त्याभोवती फिरतात. घटता विकासदर आणि बेरोजगारी हे मोदींसाठी चिंतेचे विषय आहेत. त्यामुळे मग ते ‘New India 2022’ , आत्मनिर्भर भारत अशा कॅम्पेनची घोषणा करत असतात.
2014च्या आधी मोदींची एक समस्य़ा होती, ती म्हणजे त्यांना उत्तर भारतातील ग्रामीण भागात फारशी ओळख नव्हती. मग त्यांनी त्यासाठी एक कॅम्पेन केले. Statue of Unity साठी त्यांनी शेतकऱ्यांकडून लोखंडाची मागणी केली. शेतकरी, मागासवर्गीय किंवा इतर जातींचे कुणीही असो मोदी पद्धतीशीरपणे त्यांच्या उणीवा शोधून कॅम्पेन किंवा धोऱणं (त्यांच्यासाठी दोन्ही सारखेच) राबवून त्या दूर करतात.
राहुल गांधींचे मूल्यमापन
राहुल गांधींच्या जमेच्या बाजू काय आहेत?
काँग्रेस पक्षाचा वारसा, संयुक्त पुरोगामी आघाडीवर वर्चस्व, उत्तर भारतातील काही भागात त्यांची लोकप्रियता आणि काही राज्यांमध्ये काँग्रेसची सरकारं या राहुल गांधींच्या जमेच्या बाजू.
राहुल गांधींच्या कमतरता कोणत्या?
राहुल गांधी चांगले वक्ते नाहीत, बोलताना गोंधळ करतात, सतत पराभूत होणारा नेता अशी प्रतिमा, एकमद बेपत्ता होतात आणि अचानक अवतरतात. पण या सर्व कमतरता दूर करण्य़ासाठी राहुल गांधी नियोजन करु शकतात. उत्स्फूर्त भाषणं देण्यापेक्षा व्हिडिओ रेकॉर्ड करा. एक मुद्दा घ्या आणि देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत तो मुद्दा घेऊन जा. लोक तुम्हाला पराभूत म्हणतील तर दुर्लक्ष करा. पप्पू प्रतिमा उलटून टाकण्यासाठी एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे दीर्घकालीन कॅम्पेन.
राहुल गांधींपुढच्या संधी?
राहुल गांधी यांच्यापुढे अनेक संधी आहेत. त्यातील पहिली म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न पाळलेली आश्वासने. बुलेट ट्रेन अजूनही हवेतच आहेत. परदेशातून काळा पैसा आणण्याचे आश्वासन हवेत विरले आहे. आर्थिक विकास दर घटतोय आणि बेरोजगारी वाढत चालली आहे. दलित समाजात अस्वस्थता आहे. जोपर्यंत काँग्रेस हे मुद्दे उचलत नाही तोपर्यंत ते निवडणुकीचे मुद्दे होऊ शकत नाहीत. दिवसेंदिवस सरकारविरोधी राग जनतेत वाढतोय. पण सक्षम विरोधी पक्ष नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधी लाट नसल्याचे भासवण्यात यशस्वी ठरत आहेत. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी सरकारविरोधी लाटेचा फायदा घेत जी कॅम्पेन राबवली त्याचा अभ्यास विरोधकांनी करण्याची गरज आहे.
राहुल गांधींपुढची आव्हाने
हिंदुत्व, फेक न्यूज, पंतप्रधान मोदींची प्रतिमा, काँग्रेस नेत्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप अशी आव्हाने राहुल गांधींसमोर आहेत. पण राहुल गांधींनी सत्याग्रहासारखे आंदोलन सलग महिनाभर उभे केले तर लोकांच्या डोक्यात त्यांची ‘पप्पू’ म्हणून असलेली प्रतिमा काढून टाकण्यात आणि त्यांच्याविषयी पसरलेल्या अनेक गोष्टी खोट्या आहे हे सिद्ध करण्यात ते य़शस्वी ठरु शकतात.
अंमलबजावणी महत्त्वाची
एखाद्या कॅम्पेनचे नियोजन केल्यानंतर त्याची अंमलबजावणी महत्त्वाची असते. विरोधी पक्षातर्फे त्यांचे कॅम्पेन सतत पुढे ढकलले जातात. पण नरेंद्र मोदींची कॅम्पेन सतत सुरू असतात. आपले कॅम्पेन कसे रेटावे ते नरेंद्र मोदींकडून शिकले पाहिजे. कोरोनासारख्या संकटाच्या काळातही त्यांनी राम मंदिराचे भूमिपूजन केलेच. हे कॅम्पेन आता 2024 पर्यंत सुरूच राहणार आहे. त्यांच्या कॅम्पेनचे नियोजन एक्सेल शीटवर तयार असणार एवढे नक्की…
एकंदरीतच नरेंद्र मोदींना 2024मध्ये पराभूत करायचे असेल तर 1.) राज्यांच्या निवडणुका विसरुन जा. 2.) सर्वेक्षणातून मुद्दे शोधा 3.) सर्वेक्षणातून पुढे आलेल्या प्रत्येक मुद्द्यावर कॅम्पेनचे नियोजन करा. 4.) काहीही झाले तरी पुढची 3 वर्ष या नियोजनाप्रमाणेच मार्गक्रमण करत राहा.
लेखक The Printचे Contributing Editor आहेत. लेखातील मते त्यांची वैयक्तिक मते आहेत.
https://theprint.in/opinion/four-steps-to-defeating-modi-2024-forget-state-elections/481597/