Home > मॅक्स रिपोर्ट > ६० वर्षात प्रथमच महिला  ‘डॉग हॅंडलर’ 

६० वर्षात प्रथमच महिला  ‘डॉग हॅंडलर’ 

६० वर्षात प्रथमच महिला  ‘डॉग हॅंडलर’ 
X

पोलीस दलात अनेक अवघड गुन्हांच्या तपासात श्वान पथकांची भूमीका नेहमीच महत्वाची राहिली आहे. मुंबई पोलिसांच्या याच श्वान पथकाचे यंदाचे हे हीरक महोत्सवी वर्ष असून या साठ वर्षाच्या ईतिहासात पहिल्यांदाच महिलांची नेमणूक करण्यात येणार आहे. श्वान पथकात श्वानांची देखभाल करणाऱ्यांना ‘डॉग हॅंडलर’ असं म्हटलं जातं. श्वान पथकात ‘डॉग हॅंडलर’ म्हणून १२ महिलांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या निवडीसाठी सुरूवातीला ईच्छुक महिलांची नावे मागवण्यात आली. आलेल्या अर्जातून एकूण १२ महिलांची निवड करण्यात आली असून सध्या पुणे येथे त्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. अशी माहिती संरक्षण शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली आहे.

मुंबई वरील सततचा दहशदवादी हल्ल्याचा धोका लक्षात घेता सध्या मुंबईत तीन श्वान पथके कार्यरत आहेत. यात गुन्हे शाखेसाठी एक स्वतंत्र पथक असून मुंबईत सतत होणारे व्हीआयपी दौरे, सभा, मोर्चा याकरीता गोरेगाव येथे स्वतंत्र श्वान पथक आहे. तर तिसरं म्हणजे विषेश प्रशिक्षित बॉंम्ब शोधक व बॉंम्ब नाशक श्वान पथक असे तीन प्रकार आहेत.

त्यामुळे आता लवकरचं मुंबईच्या सुरक्षेची जबाबदारी नारी शक्तिकडे य़ेणार आहे.

Updated : 16 Jan 2019 3:34 PM IST
Next Story
Share it
Top