#Ukraine : पडद्यावरचा अध्यक्ष ते वास्तवातील अध्यक्ष, Zelensky यांचा प्रवास
देशावर आक्रमण झाल्यानंतर पळून न जाता आपल्या कुटुंबासह युक्रेनमध्ये थांबणारे आणि पुतीन यांना कडवी झुंज देणारे राष्ट्राध्यक्ष वोल्दोमीर झेलेन्स्की सध्या चर्चेत आहेत....झेलेन्स्की यांचा जीवनप्रवास काय आहे, ते सांगणारा रिपोर्ट....
X
केवळ युक्रेन नाही तर जगातील अनेकांसाठी हीरो बनलेले युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमीर झेलेन्स्की यांच्या भाषणावर युरोपियन युनियनच्या अधिवेशनात १ मिनिटांपेक्षा जास्त वेळ टाळ्यांचा कडकडाट झाला....एवढेच नाही तर झेलेन्स्की यांच्या पाठिशी आता बलाढ्य अमेरिकेसह संपूर्ण युरोप उभा राहिला आहे....
टीव्हीवरील विनोदी हिरो
यानंतर झेलेन्स्की नेमके आहेत तरी कोण, त्यांची पार्श्वभूमी काय आहे, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. झेलेन्स्की यांचा प्रवास एक विनोदी अभिनेता ते राष्ट्राध्यक्ष असा झाला आहे. टीव्हीवरील "Servant of the People" या विनोदी कार्यक्रमातून त्यांची देशाला ओळख झाली. यामध्ये त्यांनी एका शिक्षकाची भूमिका केली होती, हाच शिक्षक एक दिवस देशाचा राष्ट्राध्यक्ष बनतो, अशी या कार्यक्रमाची कथा होती.
कार्यक्रमाच्या नावानेच पक्ष केला स्थापन
एकीकडे निवडणूक लढवत असताना झेलेन्स्की यांनी आपला हा कार्यक्रमही सुरू ठेवला होता. एवढेच नाही तर त्यांनी या कार्यक्रमाला असलेले नावच आपल्या पक्षाला दिले ते म्हणजे सर्वंट ऑफ पीपल....त्यानंतर त्यांनी युक्रेनचे माजी राष्ट्राध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को यांचा २०१९मध्ये पराभव केला. त्यांना जवळपास ७० टक्के मते मिळाली होती.
#Ukraine : पडद्यावरचा अध्यक्ष ते वास्तवातील अध्यक्ष, Zelensky यांचा प्रवासटीव्हीवरील शो सुरू होण्याआधी झेलेन्स्की यांनी २००६मध्ये युक्रेनच्या डान्सिंग विथ स्टार्स कार्यक्रमात पहिला क्रमांक पटकावला होता. ४४ वर्षाचे झेलेन्स्की यांना दोन मुलं आहेत. ज्यू असलेल्या झेलेन्स्की यांच्या आजोबांनी जर्मनीविरोधी सोविएत रशियातर्फे लढा दिला होता.
पुतीन यांनी झेलेन्स्की हे नाझींच्या बाजूचे असल्याचा आरोप केला होता. त्याला उत्तर देतांना आपले आजोहबा नाझींविरोधात लढले, आमचे सुमारे ८ लाख लोक नाझींनी मारले, तर मी नाझींना पाठींबा कसा काय देऊ शकतो, असा सवालही त्यांनी विचारला होता. या युद्धात युक्रेन जिंकला किंवा हरला तरी झेलेन्स्की आणि युक्रेनच्या जनतेचा लढा कायम लक्षात राहील...