Home > मॅक्स रिपोर्ट > दारूबंदीसाठी सुरू असलेले महिलांचे उपोषण शासनाकडून बेदखल

दारूबंदीसाठी सुरू असलेले महिलांचे उपोषण शासनाकडून बेदखल

दारूबंदीसाठी सुरू असलेले महिलांचे उपोषण शासनाकडून बेदखल
X

बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील बीबी या गावांमध्ये चंद्रपूर येथील सुधाकर विठोबा गोराकार यांच्या मालकीचे देशी दारूचे दुकान स्थलांतरित करण्यात आले, आणि या संदर्भात ग्रामपंचायत कडून गावांमध्ये दारूचे दुकान सुरू करण्यासंदर्भात ठराव घेण्यात आला, मात्र हा ठराव नियमबाह्य पद्धतीने घेण्यात आल्याचा आरोप या महिलांनी करत उपोषणाचे हत्यार उगारले आहे. बुलडाणा जिल्हा परिषद अध्यक्षा, उपाध्यक्षा व मुख्य कार्यकारी अधिकारी ह्या तीनही महिला असूनही शासनदरबारी महिलांचा लढा बेदखल झाला आहे.

असा ठराव घेत असताना ग्रामपंचायत अधिनियमानुसार ग्रामसभेची वेळ आणि दिवस ठरवून गावकऱ्यांना दवंडी द्वारे किंवा इतर मार्गाने सूचित करणे अनिवार्य आहे, मात्र असे न करता चुकीच्या पद्धतीने हा ठराव संमत केल्याचे या महिलांनी सांगितले आहे, त्यामुळे महिलांनी ठरावाच्या विरोधात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष व उत्पादन शुल्क विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या, मात्र अजूनही गावामध्ये दारूबंदी होत नसल्याने गेल्या दहा दिवसापासून महिला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत, मात्र गेल्या दहा दिवसांमध्ये त्यांना दिलासादायक आश्वासन मिळाले नसल्याने त्यांचे उपोषण अजूनही सुरू आहे...

आता यातील काही महिलांची प्रकृती खालावत चाललीये, तर दुसरीकडे 23 डिसेंबर रोजी स्थायी समितीची बैठक आयोजित केली असून या बैठकीमध्ये महिलांच्या उपोषण संदर्भात चर्चा करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांनी सांगितले आहे, आणि जोपर्यंत हा ठराव नामंजूर होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा पवित्रा या महिलांनी घेतलाय... त्यामुळे आता या स्थायी समितीमध्ये नेमका काय निर्णय घेतला जातो हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे... तर दुसरीकडे बुलडाणा जिल्हा परिषद अध्यक्षा, उपाध्यक्षा व मुख्य कार्यकारी अधिकारी ह्या तीनही महिलाच आहेत, आणि दारूबंदीच्या संदर्भात आंदोलन करणाऱ्या देखील महिलाच असल्याने अजूनही याच्यावर तोडगा निघत नसणे ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल...


Updated : 22 Dec 2021 6:35 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top