जमिनी परत मिळाव्यात, खारेपाट विभाग शेतकऱ्यांची सरकारकडे जोरदार मागणी
उद्योग आणि रोजगाराचं अमिष दाखवून उद्योगांनी जमीनी घेतल्या परंतू आता रोजगाराचे स्वप्न भंगले, 27 वर्षानंतर ही खारेपाट विभाग प्रकल्पांच्या प्रतिक्षेत, जमिनीही गेल्या रोजगारही नाही प्रकल्पांच्या जमिनी वापराविना पडल्या असून जमीनी पुन्हा द्याव्यात अशी शेतकऱ्यांची मागणी आहे, प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा रिपोर्ट...
X
एकेकाळी भाताचे कोठार म्हणून जगभर ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यात आता भात आयात करावा लागतो की काय अशी वेळ येउन ठेपली आहे. रायगड जिल्ह्यातील अनेक भागात नवनवीन उद्योग धंदे, कारखाने व ओद्योगिकीकरनाने झपाट्याने वेग घेतला आहे. तर दुसर्या बाजुला परिस्तिती काही औरच दिसून येतेय. विस्तीर्ण अशा समुद्रकिनाऱ्यासोबत मुंबईला लागून असलेला तालुका म्हणून अलिबाग परिसरात उद्योजकांनी शेतकऱ्यांकडून हजारो एकर जागा खरेदी केल्या आहेत. व येथिल जनतेला प्रकल्प व कारखाने निर्मीती ची आस लावली, मात्र आजतागायत इथ कारखान्याची एक वीट ही रचली नाही.अलिबाग तालुक्यातील खारेपाट ,रेवस कुर्डुस , श्रीगांव , खानाव , उसर या परिसरात वेगवेगळ्या कंपन्यांनी शेतकऱ्यांकडून प्रकल्पासाठी हजारो एकर जमिनी खरेदी केल्या आहेत.
रेवस - हाशिवरे परिसरातही शेकडो एकर जमिनी २८ वर्षापूर्वी उद्योजकांनी खरेदी केल्या आहेत . या परिसरात वस पोर्टसह १७ विविध कंपन्यांचे प्रकल्प उभारले जाणार होते . नवनवीन उद्योग उभारले जातील, व स्थानिकांना नोकर्या व रोजगाराच्या संधी निर्माण होतील अशी आशा येथिल जनतेला होती. मात्र या सर्व स्वप्न व अपेक्षांचा चुराडा झाला हेच खरे. कारण इतक्या वर्षात इथ एकही कारखाना उभा राहिला नाही, ऊलट सुपीक जमिनी नापिक व ओसाड झाल्या, त्यामूळे स्थानिक ग्रामस्त व तरुणांंमध्ये असंतोष निर्माण झालाय.
कंपनी येणार असल्याने परिसराचा चहुदिशांचा विकास तसेच स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार होता. प्रकल्पांसाठी हजारो एकर जमीन शेतकऱ्यांनी कवडीमोलाने उद्योजकांना दिली आहे. मात्र कंपन्यांची उभारणीच झाली नसल्यामुळे शेतकरी हवालदिल आहेत. अनेक कंपन्यांनी खरेदी केलेल्या जागांवरील प्रकल्प हे कागदावरच राहिल्याने जमिनीही गेल्या आणि रोजगारही नाही , आज येथिल ग्रामस्थ व सुशिक्षित तरुणांवर शहरात जावुन नाईलाजाने हॉटेलात भांडी घास ण्या ची वेळ आली आहे. वृध्द आईवडिलांना गावी सोडुन नोकरी धंद्या निमित्त शहरी किंवा इतरत्र जिल्ह्याबाहेर जाण्याची नामुष्की ओढवली आहे. अशी अवस्था अनेक गावांची आहे. त्यामुळे घेतलेल्या जमिनी परत द्या, अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे. नवीन प्रकल्पांना खीळ प्रकल्पासाठी घेतलेल्या जमिनी अनेक उद्योजकांनी त्यांना विकल्या आहेत.
ज्या कारणासाठी शेतकन्यांनी जमिनी उद्योजकांना दिल्या होत्या तेच पूर्ण स्वप्न मिळाल्याने आम च्या जमिनी आम्हाला परत करा,अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. तसेच नवीन येणाऱ्या प्रकल्पांनाही या कारणामुळे शेतकरी जमीन देण्यास विरोध करीत असल्याने प्रकल्पांनाही खीळ बसली आहे. खारेपाट परिसरात हजारो एकर जमिनी शेतकरी वर्गाकडून खरेदी केल्या आहेत. मात्र वीस वर्षे होऊन गेले तरी अद्याप एकही कंपनी अस्तित्वात आलेली नाही,शेतकरी वर्गाच्या जमिनी तर गेल्या , पण प्रकल्पही नाही.
याबाबत शासन प्रशासनाकडे विविध अर्ज , निवेदन दिले असले तरी याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले . सरकारने आमच्या मागणीची जलद दखल घ्यावी व आमच्या जमिनी पुन्हा आमच्या ताब्यात द्याव्यात अशी मागणी केलीय. प्रकल्प उभारण्याच्या ऊद्देशाने काही कंपन्यांनी जमीन खरेदी करून १५ वर्षे झाली आहेत . तसेच ज्या पडीक आहेत , त्याचे प्रस्ताव शासनाकडे पाठविले आहेत . यामध्ये काही कंपन्यांच्याबाबत दावा सुरू आहे. तर काही जमिनी शासनाकडे जमा झाल्या आहेत , अलिबाग तहसिलदार सचिन शेजाळ यांनी सांगितले.