Home > मॅक्स रिपोर्ट > जनतेचा जाहीरनामा : प्रत्येक घरात शौचालय महानगरपालिकेची योजना फेल...

जनतेचा जाहीरनामा : प्रत्येक घरात शौचालय महानगरपालिकेची योजना फेल...

गेल्या 2 वर्षापूर्वी मुंबई महानगरपालिकेने प्रत्येक घरात शौचालय ही योजना आणली. नागरिकांनी प्रत्येक घरात शौचालय देखील बसवली पण पाईप कनेक्शन अर्धवट असल्याने त्याचा लाभ स्थानिकांना घेता येत नाही. गेल्या 2 वर्ष शौचालयाचा भांड प्रत्येक घरात असंच बसून ठेवलं आहे तो स्थानिक नगरसेविका अश्विनी हांडे यांनी काहीच मार्ग काढला नाही असा आरोप स्थानिक नागरीक करत आहेत, प्रतिनिधी प्रसेनजीत जाधव यांचा रिपोर्ट...

जनतेचा जाहीरनामा : प्रत्येक घरात शौचालय महानगरपालिकेची योजना  फेल...
X

मुंबईतील घाटकोपर अंतर्गत भटवाडी येथील वॉर्ड क्रमांक 128 येथील नागिकांच्या प्रचंड समस्या आहेत तेथील नगरसेविका अश्विनी हांडे या शिवसेनेतून निवडून आलेले आहेत. त्यांनी कोणतीच कामे केली नाहीत असे तेथील स्थानिक नागरिक सांगतात.

गेल्या 2 वर्षापूर्वी मुंबई महानगरपालिकेने प्रत्येक घरात शौचालय ही योजना आणली. नागरिकांनी प्रत्येक घरात शौचालय देखील बसवली पण पाईप कनेक्शन अर्धवट असल्याने त्याचा लाभ स्थानिकांना घेता येत नाही. गेल्या 2 वर्ष शौचालयाचा भांड प्रत्येक घरात असंच बसून ठेवल आहे तो स्थानिक नगरसेविका अश्विनी हांडे यांनी काहीच मार्ग काढला नाही.





याच वॉर्ड मध्ये खेळायचे मैदान वॉर्ड क्रमांक दोन या ठिकाणी अनधिकृत पार्किंग सुरु केली आहे. त्याचा फायदा नगरसेविका यांना होतो. तेथील शौचालय मोडकळीस आलेली आहेत. उंदरांनी काही ठिकाणी बिळे देखील तयार केली आहेत. शौचालयाचे पाई पाला गळती लागल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहेत.त्याचबरोबर नागरिकांना शोचालय पडण्याची भीती वाटत असल्याने लवकरात लवकर उपाय नगरसेविकाकडून केला गेला नाही.दत्तक वस्ती योजने अंतर्गत कोणताही कंत्रादारांकडून साफ सफाई होत नाही. कंत्राटदारांची कोणतेही वेळ ठराविक नसते त्यामुळे अनेक भागात कचरा विस्कळीत झाला आहे.

पावसाळ्यात डोंगराळ भागातील भिंत कोसळली पण साधी पाहणी करायला देखील नगरसेविका तिथे आले नाहीत अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. बस स्टॉप येथे तर अनेक अनधिकृत पार्कींग जास्त प्रमाणात पाहायला मिळते.

Updated : 27 Sept 2022 8:10 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top