बोगसगिरीचा पर्दाफाश केल्यानंतर आठवडाभरानंतरही कारवाई नाहीच
बोगस कलाकाराच्या हातून होतोय कोट्यावधींचा खर्च , कला शाखांच्या हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सुरू आहे खेळ, सरकारकडून कारवाई कधी होणार ?
X
राज्य शासनाच्या कला संचालनालयात बसलेल्या बोगस कलाकाराच्या बोगसगिरीचा पर्दाफाश केल्यानंतर आठवडाभरानंतरही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून कारवाई नाही. मात्र पात्रता नसलेल्या बोगस कलाकाराने गेल्या आठ वर्षात कोट्यावधींचा खर्च केल्याचं समोर आलंय.

राज्य शासनाने 2015 मध्ये राजीव मिश्रा यांची पात्रता नसतानाही त्यांना कला संचालनालयाचे प्रभारी संचालक पद दिले. त्यानंतर राज्यपालांच्या आदेशाने याच बोगस कलाकाराला अमर्याद काळासाठी प्रभारी कला संचालक पद बहाल करण्यात आले. मात्र जे जे तील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या प्राचार्य पदीच बोगस पद्धतीने निवडल्या गेलेल्या या बोगस कलाकाराच्या हातून कोट्यावधींचा खर्च झाला आहे.

कला संचालनालयाच्या प्रभारी संचालक पदावर असलेला व्यक्ती पात्र नसतानाही त्याच्याकडून कोट्यावधी रुपये बिनधास्तपणे खर्च केले जात आहेत.
बोगसगिरीच्या माध्यमातून प्रभारी कला संचालक पदावर बसलेला बोगस कलाकार 4 शासकीय कला महाविद्यालये, 31 अनुदानित आणि 160 पेक्षा अधिक विना अनुदानित महाविद्यालयांसंदर्भात महत्वाचे निर्णय घेतांना दिसतोय. एवढंच नाही तर राज्यात दरवर्षी 11 हजार 59 विद्यार्थी कला शाखेचं शिक्षण घेत असतात. त्यामुळे या महाविद्यालयांचं नियंत्रण करणारा कलाकारच बोगस असेल तर गेल्या आठ वर्षात तब्बल 88 हजार 472 विद्यार्थ्यांचं काय? असा महत्वाचा प्रश्न निर्माण होतोय.

या बोगस कलाकाराच्या हातून दरवर्षी अंदाजे 50 कोटींची बिलं मंजूर केली जातात. त्यामुळे पात्रता नसतानाही कला संचालक पदावर बसलेल्या बोगस कलाकाराच्या हातून अंदाजे 400 कोटींचा खर्च झालाय. त्यामुळे या कलाकारावर कारवाई करून उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी माजी विधानपरिषद सदस्य ना. गो गाणार यांनी केलीय.

गेल्या आठ दिवसानंतर अजूनही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बोगस कलाकारावर कारवाई केली नाही. पण कोट्यावधींचा खर्च ज्या बोगस कलाकाराच्या हातून होतोय. त्या बोगस कलाकाराला सरकार अभय का देतंय? हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य ज्या कला शाखेशी जोडलं गेलंय. त्यांच्या भविष्याशी सरकारचा खेळ का सुरूय? याचं उत्तर अजूनही सरकार देत नाही. पण सरकारने डोळ्यावरची झापडं उघडून बोगस कलाकारावर कारवाई करण्याची गरज आहे.Rajiv Mishra, Art Directorate, College of Architecture principle, Chandrakant Patil, Exclusive Report
