Home > Election 2020 > मत एका उमेदवाला दिलं, गेलं दुसऱ्यालाच - आसामच्या माजी पोलिस महासंचालकांचा दावा
मत एका उमेदवाला दिलं, गेलं दुसऱ्यालाच - आसामच्या माजी पोलिस महासंचालकांचा दावा
Max Maharashtra | 25 April 2019 11:11 AM IST
X
X
लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी 23 एप्रिलला देशातील 15 राज्यात मतदान पार पडले. या राज्यामध्ये आसामच्या 4 जागेसाठी देखील मतदान पार पडले. यावेळी आसाम चे माजी पोलिस महासंचालक हरेकृष्णा डेका यांनी देखील आपला मतदानाचा हक्क “व्हीव्हीपॅट’ मशिनद्वारे बजावला. मात्र, यावेळी त्यांचं मतदान दुसऱ्याच उमेदवाराला गेल्याचा दावा हरेकृष्णा डेका यांनी केला आहे. या संदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की मी या संदर्भात तक्रार करणार होतो. मात्र, त्यांना असं सांगण्यात आलं की, तक्रार जर खोटी ठरली तर त्यांना शिक्षा होईल. म्हणून त्यांनी या संदर्भात तक्रार दिली नसल्याचं म्हटलं आहे. तसंच तसंच मी माझं मत दुसऱ्याला गेलं का? हे कसं सिद्ध करणार? असा सवाल उपस्थित केला आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये यंदा ईव्हीएमसोबत “व्हीव्हीपॅट’ (व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रायल) मशीन जोडले आहेत. यामुळे ईव्हीएमवर मतदान केल्यानंतर बाजूला असलेल्या “व्हीव्हीपॅट’च्या प्रिंटरवर मतदाराला आपण नोंदवलेले मत सात सेंकद दिसत आहे. जर एखाद्या मतदाराने “मतदान केलेल्या पक्षाचे चिन्ह व्हीव्हीपॅट मशीनवर दिसले नाही, दुसऱ्याच उमेदवाराचे अथवा पक्षाचे चिन्ह त्याच्यावर दिसले’ आणि अशी तक्रार मतदाराने केली आणि ती तक्रार खोटी ठरल्यास संबंधित मतदाराला जेलची हवा खावी लागणार आहे. याप्रकरणी संबंधित मतदाराला सहा महिन्यांची कैद अथवा एक हजार रुपये दंड अशी शिक्षा होऊ शकते. त्यामुळे जर एखाद्या मतदाराचे मत दुसऱ्याला जरी गेले तरी मतदार जेलची हवा खायला लागू नये म्हणून तक्रार करत नसल्याचं समोर आलं आहे.
जर एखाद्या मतदाराने मतदानकरतेवेळी “व्हीव्हीपॅट’वर आक्षेप नोंदविला आणि ज्या उमेदवारला मत दिले त्या उमेदवाराचे चिन्ह “व्हीव्हीपॅट’वर न दिसता दुसऱ्याच उमेदवाराचे चिन्ह दिसले अशी तक्रार केली, तर त्या तक्रारीची दखल संबंधित मतदान केंद्रस्तरीत अधिकारी घेत असतो. संबंधित मतदाराला खरंच असा प्रकार घडला आहे का? याची विचारणा अधिकारी करतो. जर मतदार त्या तक्रारीवर ठाम असेल, तर त्या मतदाराकडून एक अर्ज भरून घेतला जातो. “जर मतदार खोटे बोलत असेल तर सहा महिने शिक्षा अथवा एक हजार रुपये दंड होऊ शकतो,’ या नियमाची माहिती या अर्जामध्ये असते. त्यानंतर त्या मतदाराला पुन्हा “टेस्ट व्होट’ची संधी दिली जाते.
यावेळी त्या मतदारासोबत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, मतदान केंद्रावरील राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि साक्षीदार उपस्थित राहणार आहे. जर “टेस्ट व्होट’मध्ये मतदार खोटे बोलत असल्याचे सिद्ध झाल्यास त्या मतदाराला जागेवरच पोलिसांच्या ताब्यात दिले जाते.
त्यामुळं पुन्हा एकदा व्होटींग मशिनवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असून एखाद्या मतदाराचं मत मतदान करताना दुसऱ्याच मतदाराला जात असेल तर या मतदाराने केलेला दावा मतदार कसा सिद्ध करणार? असा सवाल उपस्थित होतो. तसंच ठराविक मतदानानंतर (voting frequency) जर एक मत एका विशिष्ट उमेदवाराला जात असेल तर मतदार त्याचं मत दुसऱ्या उमेदवाराला गेलं आहे. हे कसं सिद्ध करु शकतो. असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात. त्यामुळे मतदारांच्या मनात ईव्हीएम बाबतचा संशय कायम असल्याचं दिसून येतं.
Updated : 25 April 2019 11:11 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire