पर्यावरण संवर्धनासाठी पाहुण्यांना पाहुणचारात चिमणीचे घरटे भेट
अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती असल्याने आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचे आपण अतिथ्य करतो, जाताना त्यांचा निरोपही घेतो, परंतु जाताना त्यांना पक्षी संवर्धनाचा वसा देऊन पक्षांसाठी एक घर भेट स्वरूपात देऊन सरला कामे व अशोक कुमावत हे दांपत्य अनोखा पाहुणचार सुद्धा करत आहे, एक रिपोर्ट...
X
शिक्षक असलेल्या श्रीमती सरला कामे कुमावत व अशोक कुमावत या पक्षीप्रेमी दांपत्याने एक अभिनव उपक्रम राबवून पर्यावरणात पक्षी संवर्धनाचा वसा स्वतःही घेतला आहे व इतरांपर्यंत ही पोचवत आहे ते म्हणजे पक्ष्यांची घरटे.
पक्ष्यांच्या अनेक प्रजाती संपत चालली आहेत तसेच चिमणी सुद्धा दुर्मिळ होत चाललेली आहे. म्हणून चिमण्यांची व पक्ष्यांची संख्या वाढवण्यासाठी आपल्याला समाजाचं काही देणं म्हणून उपक्रम हाती घेतला. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती असल्याने आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचे आपण अतिथ्य करतो, जाताना त्यांचा निरोपही घेतो, परंतु जाताना त्यांना पक्षी संवर्धनाचा वसा देऊन पक्षांसाठी एक घर भेट स्वरूपात देऊन सरला कामे व अशोक कुमावत हे दांपत्य अनोखा पाहुणचार सुद्धा करत आहे.
प्लायुडचे चिमणीचे घर तयार करून त्याला शोभिवंत करून त्यांनी हा वसा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून हि युक्ती लढवली आहे थोडीशे दाणे थोडेसे पाणी ही संकल्पना राबवत ते गेल्या वीस वर्षापासून पक्ष्यांना विविध धान्याचे दाणे व पाणी देत असतात त्यांच्या घराच्या कंपाउंड वर चिमणी, कावळे, कबूतर, साळुंक्या, भारद्वाज यांसारखे पक्षी येऊन दररोज आपली तहान व भूक भागवत असतात उन्हाची प्रखरता जाणवत असल्यामुळे पक्षांना चारा- पाण्यासाठी तसेच आपल्या घर बनवण्यासाठी मैलोन-मैल प्रवास करावा लागतो.
तसेच ग्लोबल वार्मिंग मुळे त्यांना पर्यावरणाचाही त्रास होत असल्यामुळे या दाम्पत्याने पक्ष्यांची संख्या वाढावी म्हणुन थोडेसे दाने थोडेसे पाणी एक छोटसं घर ही संकल्पना घेवून एक नवीन उपक्रम राबवले आहे. विविध पक्षांच्या प्रजाती संपत आलेले आहेत .जर या प्रमाणेच आपण सर्व पक्षांना संवर्धन केले तर नक्कीच पक्ष्यांची संख्या वाढून पर्यावरणामध्ये वाढ होणार आहे, असे त्यांना वाटते त्यांच्या या पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमाचे सर्वञ कौतुक होत आहे.