Home > मॅक्स रिपोर्ट > जनतेचा जाहीरनामा : टाटा हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या कॅन्सरग्रस्तांचे हाल कधी थांबणार?

जनतेचा जाहीरनामा : टाटा हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या कॅन्सरग्रस्तांचे हाल कधी थांबणार?

कॅन्सरवर मोफत आणि चांगले उपचार होतात म्हणून मुंबईतील टाटा हॉस्पिटल प्रसिद्ध आहे. पण या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या शेकडो रुग्णांना फूटपाथवर रहावे लागते, त्यांच्या वेदना मांडणारा प्रसन्नजीत जाधव यांचा ग्राऊंड रिपोर्ट

जनतेचा जाहीरनामा : टाटा हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या कॅन्सरग्रस्तांचे हाल कधी थांबणार?
X

कॅन्सरग्रस्तांवर मोफत उपचार करणाऱ्या मुंबईतील टाटा हॉस्पिटलमध्ये देशभरातून रुग्ण येत असतात. पण यातील अनेक रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना फुटपाथवर राहावे लागते. टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये कॅन्सरग्रस्त रुग्णांवर मोफत इलाज केला जातात म्हणून हे लोक दूरवरून म्हणजेच उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, झारखंड, अशा विविध राज्यांमधून येतात. मुंबईतील टाटा मेमोरियल रुग्णालयामध्ये लांबून येणे परवडत नाही म्हणून या लोकांना उपचार पूर्ण होईपर्यंत अनेक महिने फूटपाथवर रहावे लागते.




रुग्णांची संख्या पाहता हॉस्पिटलमधील बेड कमी पडतात. आसपास धर्मशाळा असल्या तरी सगळ्यांना त्यात जागा मिळत नाही, हॉटेल परवडत नाही. त्यामुळे अनेकजणांना रस्त्यावरच दिवस काढावे लागतात. पावसाळ्यात तर या रुग्णांचे मोठे हाल होतात.





कॅन्सरग्रस्त रुग्णांना आरामाची आवश्यकता असते. हे रुग्ण लवकरात लवकर बरे होऊन घरी जाण्याची वाट पाहत असतात. पण त्यांना फुटपाथवर रहाण्याशिवाजी पर्याय नसतो. कधी कधी तर शौचालयासाठी 15 रुपये आणि अंघोळीसाठी 20 रुपये द्यावे लागतात, असेही काहींचे म्हणणे आहे.





रस्त्यावर निवारा म्हणून ताडपत्री लावली तर महापालिकेचे कर्मचारी ते काढून नेतात, त्यामुळे पावसात भिजतच तिथे रहावे लागते असेही अनेकांनी सांगितले आहे. मुंबईत उपचारासाठी येणाऱ्या या गरिब रुग्णांसाठी कायम स्वरुपी सोय होण्याची गरज आहे.

Updated : 10 Sept 2022 1:45 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top