बीड जिल्ह्यातील स्त्रीभ्रूण हत्यांचे रॅकेट कधी बंद होणार?
हरीदास तावरे | 9 Jun 2022 3:47 PM IST
X
X
बीड जिल्ह्यातील बकरवाडीमध्ये एका ऊसतोड महिलेचा अवैध गर्भपाता दरम्यान मृत्यू झाला आहे. एका गोठ्यामध्ये तिचा गर्भपात करण्यात आला. यामध्ये संबंधित महिलेचा रक्तस्त्राव न थांबल्याने तिचा मृत्यू झाला आहे. तीन मुली असल्याने मुलाच्या हव्यासापोटी चौथ्यांदा ती महिला गरोदार राहिली. पण बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान केल्यानंतर मुलगी होणार असल्याने तिचा गर्भपात करण्यात आला. पण यामध्ये ज्या नर्सने हा गर्भपात केला, तिचाही मृतदेह सापडल्याने या प्रकऱणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करुन यामागे रॅकेट आहे का, याची चौकशी करुन त्यांच्यावरही कारवाई व्हावी अशी मागणी, सामाजिक कार्यकर्त्या मनिषा तोकले आणि तत्वशील कांबळे यांनी केली आहे.
Updated : 9 Jun 2022 3:47 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire