डॉ. कोल्हे दाम्पत्याला पद्मश्री पुरस्कार
X
मेळघाटासारख्या अति दुर्गम भागात अगदी कमी पैशांत औषधोपचार देणारे डॉ. रवींद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. वैद्यकीय क्षेत्रात असणाऱ्या त्यांच्या मोलाच्या कामगिरीची दखल घेत केंद्र सरकारने डॉ. कोल्हे जोडप्याला पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे.
अमरातीतलं बेहरागड…पूर्णतः आदिवासी गाव…या गावात औषधोपचार काय हे माहितीच नाही. अशा ठिकाणी केवळ वैदूच उपचार करायचे. या ठिकाणच्या लोकांना वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी डॉ. कोल्हे यांनी पुढाकार घेतला आणि बेहरामगड या गावातील नागरिकांना औषधोपचार देण्यास सुरुवात केली. थोडी औषधं आणि काही पैसे घेऊन मेळघाटातील बेहरागडपासून त्यांनी आपल्या वैद्यकीय सेवा पुरवण्याच्या कामाला सुरुवात केली. तब्बल 40 किलोमीटर पायी चालत जाऊन त्यांनी बेहरागडमधील रूग्णांची सेवा केली.
अत्यंत कठीण परिस्थितीत डॉ. कोल्हे गेली 30-35 वर्ष आरोग्यसेवा पुरवण्याचं काम करत आहेत. आदिवासी बहुल ग्रामीण भागात वैद्यकीय मदत देण्याचं काम ते करतात. तर डॉ. स्मिता कोल्हे या आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, त्यादेखील अविरतपणे डॉ. रवींद्र यांच्यासोबत आरोग्यसेवेचं काम करतात. आदिवासी भागात केवळ 1 रूपया फी आणि ती देखील फक्त औषध खरेदीसाठी घेऊन हे डॉक्टर जोडपं आरोग्यसेवा पुरवतं.
दरम्यान आरोग्य क्षेत्रातील मोलाच्या कामगिरीसाठी माय मेडिकल मंत्रा या वेबपोर्टलने डॉ. कोल्हे या दाम्पत्याची मुलाखत घेतली असून नेमकं काय म्हटले हे दाम्पत्य जाणून घेऊयात....
सौजन्य- माय मेडिकल मंत्रा...
https://youtu.be/3GyE38LGsls