Home > मॅक्स रिपोर्ट > दांडी बहाद्दर डॉक्टरांना कोणाचं अभय ? 

दांडी बहाद्दर डॉक्टरांना कोणाचं अभय ? 

दांडी बहाद्दर डॉक्टरांना कोणाचं अभय ? 
X

बीड जिल्ह्यातील नाळवंडी गावात, उभारण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये, आरोग्य विभागात सुरू असलेला 'दांडी मारो' असा धक्कादायक प्रकार रात्री उघडकीस आलाय. दोन डॉक्टर असलेल्या या शासकीय दवाखान्यात रात्री 10:30 च्या दरम्यान एकही डॉक्टर उपलब्ध नसल्याचं 'मॅक्समहाराष्ट्रच्या स्टिंग' मध्ये उघडकीस आलय. विशेष म्हणजे एक डॉक्टर या गावांमध्ये निवासी रहावा, अशी तरतूद करण्यात आलेली आहे. त्यासाठी शासनाने त्यांना सुज्जत असे 5 निवासस्थाने देखील बांधलेली आहेत. मात्र हेच निवासस्थाने ओस पडल्याचे चित्र नाळवंडी गावात दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यापासून हे आरोग्य केंद्र रात्रीला 'राम भरोसे' असल्याने, गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरल्याची दिसत आहे.

गेल्या दोन वर्षांपूर्वी याच दांडी बहाद्दर डॉक्टरांच्या गैरहजरीमुळे, गावातील एका गर्भवती महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. तरी देखील या निगरगट्ट आरोग्य विभागाने, याची कोणतीच दखल घेतलेली नाही. मग नेमकं आणखीन किती जणांचा बळी या आरोग्य विभागाला घ्यायचा आहे ? हा प्रश्न समोर येत आहे.

या प्राथमिक आरोग्य केंद्रात 43 गावांचा समावेश केलेला आहे. हा सर्व परिसर ग्रामीण भागात येत असल्याने येथील नागरिकांचा मुख्यव्यवसाय हा शेती आहे. त्यामुळं रात्री अपरात्री शेतकरी बांधव, आपल्या पिकांना पाणी देण्यासाठी दाऱ्यावर जातात. याचदरम्यान दुर्दैवाने एखाद्या शेतकऱ्याला विषारी साप चावला तर तो जिल्हा रुग्णालयात येईपर्यंत वाचेल का ? याचा विश्वास देखील नाही. एखादी प्रेग्नेंट महिला अचानक आजारी पडली तर तिच्यावर प्राथमिक उपचार कोण देणार ? एखाद्याला ऍटॅक आला, तर त्याच्यावर उपचार कोण करणार ? असे एक ना अनेक प्रश्न नाळवंडी गावकऱ्यांसह परिसरातील गावकर्यांनसमोर आहेत. त्यामुळं या निगरगट्ट डॉक्टरांना कोणाचं अभय आहे ? हाच मोठा प्रश्न समोर येत आहे..

Updated : 13 Nov 2018 5:33 PM IST
Next Story
Share it
Top