महिलांना खरचं न्याय मिळतो का?
X
महिला अत्याचाराच्या घटना आज नवीन नाहीत. दिवसेंदिवस याचा आकडा वाढत चाललेला आहे. बलात्कार, लैंगिक छळ, छेडछाड अशा अनेक प्रकरणांच्या बातम्या आपण वर्तमानपत्रात आणि टिव्ही चॅनल्सवर पाहतो. पोलिसात महिलांवरील झालेल्या अत्याचाराची तक्रारही नोंदवून घेतली जाते. परंतु या प्रक्रियानंतर काय होत… कुणाला ठाऊक.. पीडित महिला वर्षानुवर्ष न्यायाच्या प्रतिक्षेत असतात. परंतु न्यायालयीन दरबारी संथ गतीने काम सुरु असल्यामुळे कित्येक पीडित महिला कंटाळून माघार घेतात. समाजात आज महिलांवरील अनेक अत्याचाराची वाच्यता होत असते परंतु त्या अत्याचाराला न्याय मिळतो का? असा प्रश्न तुम्हा-आम्हाला पडलेला असतो. कारण प्रक्रियेचा कालावधी लांब लचक असल्यामुळे स्वतःच थांबण्याचा निर्णय पीडितांकडून घेतला जातो. तसेच १ हजार ३२६ प्रकरणांमधील ९११ प्रकरणांमध्ये संशयितांवरील आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. तपासाचा दर्जा, सत्र न्यायालयात खटला चालवण्याची पद्धत निकृष्ठ असल्याचे निरीक्षण एका फाऊंडेशनच्या मार्फत करण्यात आले आहे.
लैंगिक अत्याचाराचे गुन्हे न्यायालयात सिद्ध होण्याचे प्रमाण कमी असल्याचेही निदर्शनास आले.
एखाद्या महिलेवर जर लैंगिक अत्याचार झाला असेल तर कशी तक्रार नोंदवावी याचा व्हिडीओ पाहुयात…