धारावी: अनलॉक केल्यानंतर परिस्थीती ठीक होण्यास काही वर्ष लागतील...
X
देशात अनलॉकची घोषणा झाली आहे. तर राज्यात मिशन बिगीन अगेन ची घोषणा केली आहे. मात्र, या फक्त घोषणाच ठरल्या आहेत. कोरोनाच्या या संकटकाळात आर्थिक गर्तेत अडकेलेला माणूस यातुन अद्यापपर्यंत बाहेर पडलेला नाही.
लॉकडाउन शिथिल केल्यानंतरही त्याचा व्यापारी, किरकोळ विक्रेते यांच्यावर फारसा परिणाम झाला नाही. आड्यात नाही तर पोहऱ्यात येणार तरी कुठून? ग्राहकांच्या खिशात लॉकडाऊन मुळं पैसाच नाही तर ग्राहक खरेदी कशी करणार? असा सवाल आता उपस्थित होतो. त्यामुळं “ग्राहकांची खरेदीशक्ती कमी होत असल्याचं दिसून आलं आहे. अलीकडेच रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया ने केलेल्या एका सर्वेक्षणात असं दिसून आलं आहे की,
‘लॉकडाउननंतर ५ पैकी ४ ग्राहकांनी आपल्या खरेदी खर्चात कपात केली आहे,” . या सगळ्या बातमीवरून आपल्या लक्षात येईल की लॉकडाऊन उठल्यानंतरची स्थिती कशी असेल म्हणून? आणि मुंबईला याचा किती फटका बसेल? याचा काही अंदाज आहे का आपल्याकडे?
धारावी लहान मोठ्या उद्योग समुहांची राजधानीच आहे आणि या धारावीत गल्ली गल्ली मध्ये आणि प्रत्येक घरा घरामध्ये काही ना काही उत्पादन होत असतं. धारावीमध्ये अनेक व्यवसायांनी जन्म घेतला आहे. धारावी हा परिसर पुन:प्रक्रिया व्यवसायात अग्रेसर आहे. त्यामुळे धारावीची खरी तर एक नवीन ओळख आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी झोपड्पट्टी म्हणून या परिसराची ओळख आहे. धारावीमध्ये गारमेंट चा व्यवसाय देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि या व्यवसायात धारावीतील लाखों लोक काम करत आहेत आणि धारावीमधून गारमेंट उत्पादन हे बाहेरगावी जात असतं. परकीय चलन या व्यवसायात प्राप्त होतं. त्यामुळे या व्यवसायाला खूप महत्व आहे.
आम्ही धारावीच्या गारमेंट मध्ये काम करणारे सय्यद गफूर यांच्याशी संवाद साधला. गेले ५० वर्षाहून अधिक काळ या धारावीमध्ये आम्ही राहत आहोत. या धारावीमध्ये लहानाचे मोठे झालो आहोत. गारमेंट बनवण्याचं दुकान घेऊन आम्हाला १० वर्ष झाली आहे. या लॉकडाऊन च्या काळात मात्र, आम्हाला खूप त्रास सहन करावा लागला आहे. माझ्यासोबत काम करणारे अनेक कारागीर काम सोडून गावी निघून गेले. आम्ही एकूण ५० कामगार या गारमेंट मध्ये काम करत होतो. पण आत्ता फक्त ३ कामगार राहिले आहेत. कामाला इथे फक्त आत्ता आणि संपूर्ण व्यवसाय ठप्प पडला आहे. भाडं सुद्धा यातून निघत नाही. आत्ता मग आमचा पगार कसा यातून निघणार हीच चिंता लागली आहे.
या कोरोनाच्या काळात धारावीचा खूप अप्रचार झाला आहे. त्यामुळे धारावीचं नाव खूप खराब झालं आहे. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी आमच्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे खूप मोठा आर्थिक फटका बसला आहे.
धारावीत सध्या सर्वच उद्योग धंद्यांची हिच परिस्थिती आहे. आणि लॉकडाऊन उठला तरी हे लोक यातून तात्काळ बाहेर येतीलच असं नाही. त्यामुळं काही वर्ष या लोकांना यातुन बाहेर यायला लागतील.