Home > मॅक्स रिपोर्ट > लातुरकरांनो आम्हाला माफ करा, अशुध्द पाण्यावरून उपमहापौरांनी मागितली माफी

लातुरकरांनो आम्हाला माफ करा, अशुध्द पाण्यावरून उपमहापौरांनी मागितली माफी

गेल्या अनेक दिवसांपासून लातूर शहरात नागरिकांना अशुध्द पाणी प्यावे लागत होते. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. त्यानंतर लातूरच्या महापौरांनी नागरिकांची माफी मागितली. याबाबतचा विजय कावळे यांचा रिपोर्ट...

लातुरकरांनो आम्हाला माफ करा, अशुध्द पाण्यावरून उपमहापौरांनी मागितली माफी
X

गेल्या काही दिवसांपासून लातूर शहरात अशुध्द पाणी येत होते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. मात्र या अशुध्द पाण्याच्या प्रश्नावरून नागरिकांमध्ये महापालिकेविषयी चीड निर्माण झाली होती. त्यापार्श्वभुमीवर लातूर महापालिकेचे उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी लातूरच्या नागरिकांची माफी मागितली आहे.

लातूर शहराला मागील एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी पासून पिवळसर पाण्याचा पुरवठा होत आहे. यामुळे सर्वसामान्य लातूरकरांमध्ये मोठा संताप आहे. महापालिका प्रशासनाने अनेक प्रयत्न केल्यानंतर ही पाण्यातला पिवळसरपणा काही केल्या दुर होत नाही. तर याच दूषित पाण्याचा मागील एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून पुरवठा केला जात आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांना नागरिकांनी वेळोवेळी सूचना केल्या. मात्र त्याकडे प्रशासनानेही दुर्लक्ष केले. सक्षम अधिकारी याकडे लक्ष देत नाहीत किंवा त्यांना पाण्यातला पिवळसर पणा काढणं शक्य होत नाही अशी परिस्थिती आहे. लोकप्रतिनिधी म्हणून ती जबाबदारी आमच्यावर येते आम्ही अधिकाऱ्यांना सांगू शकतो मात्र अधिकारी काम करत नाहीत. त्याचे खापर आमच्यावर फोडले जात आहे. त्यामुळे आम्ही हतबल आहोत. त्यामुळे आम्ही लातूरकरांची माफी मागत असल्याचे उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी सांगितले.

लातूर महापालिकेत निर्माण झालेल्या अनागोंदीमुळे प्रशासनाला जागं करून नागरिकांना शुध्द पिण्याचे पाणी देण्याची जबाबदारी असताना पदाधिकारी हतबल झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांची ससेहोलपट सुरूच आहे. त्यामुळे आम्हाला शुध्द पाणी कधी मिळणार असा आर्त सवाल नागरिक करत आहेत.

Updated : 11 May 2022 12:17 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top