मुंबईत डान्सबार पुन्हा सुरु...
X
गेल्या काही वर्षापासून डान्सबार वर असलेली बंदी आता उठली आहे. कारण डान्सबारसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे डान्सबारवर पूर्णपणे बंदी घालता येणार नाही असं म्हटलं आहे. त्यामुळे डान्स बार मालकांचा मार्ग मोकळा झाला आहे.
काय म्हटलं सर्वोच्च न्यायालयाने...
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार,
डान्स बारवर पूर्णपणे बंदी घालता येणार नाही. काही नियम असू शकतात पण पूर्ण बॅन करता येणार नाही. 2005 पासून एकही परवाना दिलेला नाही.
- डान्स बारसाठी परवाना मिळण्यासाठीच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत.
- शैक्षणिक संस्थांपासून डान्सबार 1 किमी च्या आत नसावा ही अटही शिथिल करण्यात आली आहे.
- महाराष्ट्र सरकारच्या डान्सबार संबंधी कायद्यास सुप्रीम कोर्टाने काही बदलांसह परवानगी दिली आहे.
- सुप्रीम कोर्टाने डान्सरला टिप देण्यास परवानगी दिली आहे पण बार डान्सरवर पैसे उधळण्यास मनाई केली आहे.
- अश्लिल नृत्यासंबंधीची परिभाषा कोर्टानेही कायम ठेवली आहे.
- कोर्टा बार आणि डान्सिंग एरिया वेगळे ठेवण्याची अट फेटाळली आहे.
- डान्सिंग एरियामध्ये सीसीटीव्हीचा नियम रद्द करण्यात आला आहे.
- मुंबईत रात्री 11.30 पर्यंच डान्स बारला परवानगी, अश्लिलता असता कामा नये