Home > मॅक्स रिपोर्ट > #MaxMaharashtraImpact : दलित वस्तीची नाकेबंदी अखेर उठली : पोलीस बंदोबस्तात कामाला सुरुवात

#MaxMaharashtraImpact : दलित वस्तीची नाकेबंदी अखेर उठली : पोलीस बंदोबस्तात कामाला सुरुवात

#MaxMaharashtraImpact : दलित वस्तीची नाकेबंदी अखेर उठली : पोलीस बंदोबस्तात कामाला सुरुवात
X

रस्ता (road) बंद केल्यामुळे झालेली दलित वस्तीची ( dalit vasti)नाकेबंदी ठिय्या आंदोलनानेही उठत नव्हती. MaxMaharashtra ने या विषयाला वाचा फोडल्यानंतर अखेर जिल्हा परीषद बांधकाम विभागानं पोलीस बंदोबस्तात ( police) रस्ता खुला करून कामाची सुरुवात केली आहे. सार्वजनिक रस्ता आडवून शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या समाजकंटकांना कायद्याची चपराक मिळाली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील जांबूड चंदनशिवे वस्ती ग्रामीण मार्ग ९८ते चंदनशिवे वस्ती ग्रामीण मार्ग ४४८जिल्हा परिषद मालकीचा रस्ता दुरुस्त करून मिळावा या मागणीसाठी चंदनशिवे वस्ती येथील नागरिक मागील एक ते दीड वर्षापासून प्रयत्न करीत आहेत. सदरचा रस्ता दुरुस्त करून मिळावा या मागणीसाठी चंदनशिवे वस्तीवरील नागरिकांनी कित्येक आंदोलने उपोषणे केली आहेत.





रस्ता दुरुस्त करण्यासाठी चंदनशिवे वस्तीवरील काही नागरिक सदरचा रस्ता हा माझ्या वैयक्तिक मालकीचा असल्याचे सांगून सदरचा रस्ता दुरुस्त करण्यासाठी अडथळा निर्माण करीत होते. परंतु चंदनशिवे वस्तीवरील नागरिकां दळणवळण करण्यासाठी इतर कोणताही पर्यायी मार्ग नसल्याने संबंधित अधिकारी यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला तसेच कित्येक आंदोलने उपोषणे केली आहेत. नागरिकांच्या प्रयत्नाला आज दिनांक सात एप्रिल 2020 रोजी यश आले असून सदरच्या रस्त्याचे काम पोलीस बंदोबस्तामध्ये सुरू करण्यात आले.





परंतु संबंधित अडवणूक करणारे यांनी पोलिस बंदोबस्तात न जुमानता सदरचा रस्ता दुरुस्त करण्यास पुन्हा हरकत अडथळा निर्माण केला. तसेच सदर ठिकाणी उपस्थित असलेल्या शाखा अभियंता यांना अरेरावीची भाषा वापरल्याने बांधकाम उपविभागाचे उपअभियंता यांनी अकलूज पोलीस स्टेशन मध्ये संबंधित रस्ता अडवणारे तिघेजण यांच्यावरती शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा नोंद केला आहे.त्यानंतर अकलूज पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांनी अडवणूक करणारे दोन आरोपी यांना ताब्यात घेतले तर एक महिला आरोपी बेपत्ता आहे. सदर आरोपींना अटक करून जांबुड चंदनशिवे वस्ती ग्रामीण मार्ग 448 रस्त्याचे काम जलद गतीने सुरू आहे.व शासकीय कामात अडथळा निर्माण करणारे यांना कायद्याची चपराक बसलेली आहे.

जांबुड गावामध्ये एकमेकाचे रस्ते अडवण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असून आज बांधकाम उपविभागाने केलेल्या कारवाई मुळे रस्ता अडवण्याचा प्रकार बंद होईल असेही नागरिकांचे मत आहे. सोलापूर जिल्ह्यातील गावच्या विकासाला हरकत अडथळा निर्माण करणाऱ्या वरती कडक कारवाई केली गेली तरच जनतेमध्ये कायद्याचे भय निर्माण होईल व गावच्या विकासाला चालना मिळेल असेही चंदनशिवे वस्तीवरील नागरिकांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.





रस्त्याचे काम सुरू झाल्याने चंदनशिवे वस्तीवरील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे आभार मानले, तसेच माळशिरस तालुक्याचे गट विकास अधिकारी प्रशांत खरात, उपअभियंता अशोकराव रणवरे, शाखा अभियंता भूमकर साहेब, अकलूज पोलीस पोलीस स्टेशनचे निरीक्षक अरुण सुगावकर साहेब, व इतर पोलीस कर्मचारी यांचे आभार व्यक्त केले.तसेच आज बंदोबस्तासाठी उपस्थित असलेले पोलीस कॉन्स्टेबल किशोर गायकवाड, संजय चंदनशिवे, तांबोळी मॅडम व महिला होमगार्ड यांचेही आभार मानले.Max Maharashtra ने सातत्याने आवाज उठवल्याने पीडितांना न्याय मिळाल्याची भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.


रस्त्याच्या मागणीसाठी जांबुड ग्रामपंचायती समोर गेल्या सोळा दिवसापासून ग्रामस्थांचे आंदोलन


Updated : 8 April 2022 8:16 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top