Home > News Update > Coronavirus: देशातील बाधीतांची संख्या ४० हजारांच्यावर, देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात
Coronavirus: देशातील बाधीतांची संख्या ४० हजारांच्यावर, देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात
Max Maharashtra | 4 May 2020 6:39 AM IST
X
X
राज्यात गेल्या २४ तासात ११५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात २११५ रुग्ण बरे झाले आहेत. आज कोरोनाबाधीत ६७८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या १२ हजार ९७४ झाली आहे. तर एकूण १० हजार ३११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आत्तापर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ७० हजार १३९ नमुन्यांपैकी १ लाख ५६ हजार ७८ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १२ हजार ९७४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात १ लाख ८१ हजार ३८२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १३ हजार १५८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
गेल्या २४ तासाच हाती आलेल्या माहितीनुसार राज्यात २७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ५४८ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २१, पुण्यातील ४, भिवंडीतील १, नवी मुंबईमधील १ मृत्यू आहे.आज झालेल्या मृत्यूंपैकी १६ पुरुष तर ११ महिला आहेत. आज झालेल्या २७ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १४ रुग्ण आहेत तर १० रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहे. या २७ रुग्णांपैकी १३ जणांमध्ये ( ४८ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूची आकडेवारी)
मुंबई महानगरपालिका: ८८०० (३४३)
ठाणे: ६० (२)
ठाणे मनपा: ४८८ (७)
नवी मुंबई मनपा: २१६ (४)
कल्याण डोंबिवली मनपा: २१२ (३)
उल्हासनगर मनपा: ४
भिवंडी निजामपूर मनपा: २१ (२)
मीरा भाईंदर मनपा: १४१ (२)
पालघर: ४४ (१)
वसई विरार मनपा: १५२ (४)
रायगड: ३० (१)
पनवेल मनपा: ५५ (२)
ठाणे मंडळ एकूण: १०,२२३ (३७१)
नाशिक: १२
नाशिक मनपा: ४३
मालेगाव मनपा: २२९ (१२)
अहमदनगर: २७ (२)
अहमदनगर मनपा: १६
धुळे: ८ (२)
धुळे मनपा: २० (१)
जळगाव: ३४ (११)
जळगाव मनपा: १२ (१)
नंदूरबार: १२ (१)
नाशिक मंडळ एकूण: ४१३ (३०)
पुणे: ८१ (४)
पुणे मनपा: १२४३ (९९)
पिंपरी चिंचवड मनपा: ७२ (३)
सोलापूर: ७
सोलापूर मनपा: १०९ (६)
सातारा: ३७ (२)
पुणे मंडळ एकूण: १५४९ (११४)
कोल्हापूर: १०
कोल्हापूर मनपा: ६
सांगली: २९
सांगली मिरज कुपवाड मनपा: २ (१)
सिंधुदुर्ग: ३ (१)
रत्नागिरी: ११ (१)
कोल्हापूर मंडळ एकूण: ६१ (३)
औरंगाबाद:५
औरंगाबाद मनपा: २३९ (९)
जालना: ८
हिंगोली: ४२
परभणी: १ (१)
परभणी मनपा: २
औरंगाबाद मंडळ एकूण: २९७ (१०)
लातूर: १२ (१)
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ३
बीड: १
नांदेड: ०
नांदेड मनपा: ३१ (१)
लातूर मंडळ एकूण: ४७ (२)
अकोला: १२ (१)
अकोला मनपा: ५०
अमरावती: ३ (१)
अमरावती मनपा: ३१ (९)
यवतमाळ: ७९
बुलढाणा: २१ (१)
वाशिम: २
अकोला मंडळ एकूण: १९८ (१२)
नागपूर: ६
नागपूर मनपा: १४६ (२)
वर्धा: ०
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर: ०
चंद्रपूर मनपा: ४
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: १५८ (२)
इतर राज्ये: २८ (४)
एकूण: १२ हजार ९७४ (५४८)
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ९९७ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ११ हजार ७८ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ५१.०५ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.
देशात काय स्थिती आहे?
गेल्या २४ तासात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढून आता ४० हजार २६३ वर पोहोचली आहे. तर १ हजार ३0६ जणांचा मृत्यू झाला आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे एकूण रुग्णांपैकी १० हजार ८८६ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने आता २८ हजार ७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान आता राज्य सरकारांच्या मदतीसाठी केंद्रानं १५ पथकं तैनात करण्याचा निर्णय़ घेतला आहे. देशातील १५ जिल्ह्यांमध्ये ही पथकं राज्य सरकारांना कोरोनाविरोधातल्या लढाईसाठी मदत करणार आहेत. यात महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे, गुजरातमध्ये अहमदाबाद आणि सुरत, दिल्लीचा काही भाग, मध्य प्रदेशात भोपाळ, इंदोर, राजस्थानात जयपूर आणि जोधपूर, तेलंगणामध्ये हैदराबाद, तामिळनाडूमध्ये चेन्नई, पश्चिम बंगालमध्ये कोलकाता आणि उत्तर प्रदेशात आग्रा इथं ही पथकं काम करणार आहेत.
जगात काय घडतंय...
संपूर्ण जगभरात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या आता ३३ लाख ५६ हजार २०५वर पोहोचली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार कोरोनामुळे जगात २ लाख ३८ हजार ७३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रविवारी दिवसभरात जगभरात ९० हजार ३९९ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेत कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या आता १२ लाखांच्या जवळपास पोहोचली असून मृतांची संख्याही आता ६७ हजार ७६४ वर पोहोचली आहे.
Updated : 4 May 2020 6:39 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire