राहुल गांधींची लोकसभा निवडणुकीत काय आहे रणनीती?
Max Maharashtra | 3 May 2019 2:15 PM IST
X
X
नोटाबंदी आणि जीएसटी मुळे देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी आता परत पंतप्रधान बनू शकत नाहीत असे मत राहूल गांधी यांनी व्यक्त केले आहे. राहुल गांधी यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राफेल डीलमधील भ्रष्टाचाराबद्दल, उत्तर प्रदेशातील अखिलेश यादव आणि मायावती यांच्या विरोधातील उमेदवारीबद्दल तसेच विरोधी पक्षांच्यावतीने पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून ते स्वत:ला कसे पाहतात या सगळ्या बद्दलही परखड मतं व्यक्त केली आहेत..
कॉंग्रेसचे उद्दिष्ट रोजगार आणि अर्थव्यवस्था सुधारण्यावर आहे. देशात बेरोजगारीचे प्रमाण खूप वाढले असून कॉंग्रेस याबाबत नक्कीच पावले उचलेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आणि शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. शेतकरी आत्महत्या करताहेत. लोकसभेच्या पहिल्या चार टप्प्यातील आमची कामगिरी उत्तम असल्याने आम्ही ही निवडणूक जिंकू असा दावाही त्यांनी यावेळी केला.
आम आदमी पक्षासोबत आघाडी का नाही?
काँग्रेस आणि आम आदमी पार्टी दरम्यान दिल्लीमध्ये आघाडी न केल्याबद्दलही राहुल म्हणाले की, आम्ही दिल्लीत 4-3 सूत्रांवर सीट देण्यासाठी तयार होतो. अरविंद केजरीवाल यांनी यासाठी सहमतीही दर्शविली होती, परंतु अचानक त्यांनी आपली भूमिका बदलली आणि हरियाणा, पंजाबसाठीच्या आघाडीविषयी बोलू लागले, जे आमच्यासाठी राजकीयदृष्ट्या सोयीचे नव्हते.
उत्तर प्रदेशमध्ये आघाडीला मदत...
उत्तर प्रदेशमध्ये भाजपला पराभूत करण्याचा आमचा हेतू असल्याचे सांगत राहुल म्हणाले की, उत्तर प्रदेशमध्ये जिथे आमचा उमेदवार आहे. तिथे आम्ही ठामपणे लढत आहोत. जिथे मजबूत उमेदवार नाही, तिथे आघाडीला मदत करत आहोत. आमचा उद्देश केवळ भाजपला पराभूत करण्याचा आहे. उत्तर प्रदेशातून भाजपाची हाकलपट्टी करण्यासाठी काँग्रेस पक्ष एकत्र काम करत असून उत्तर प्रदेशमधील धर्मनिरपेक्ष आघाडी निवडणूकीत बाजी मारेल, असा दावाही त्यांनी केला.
प्रियंका गांधींनी वाराणसीमधून माघार घेतली का?
प्रियंका गांधी यांच्या वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील उमेदवारीबाबत बोलताना राहूल यांनी सांगितले की, प्रियंका वाराणसीमधून निवडणूक लढवणार नाहीत, असा निर्णय खूप आधीच घेण्यात आला होता. मात्र, याबद्दल आपणच सुचित केल्याचे विचारताच राहूल
"मी कधीही अशी कोणतीही भावना व्यक्त केली नाही." मी असं म्हटलं होतं की, “मी तुमच्या मध्ये उत्सुकता निर्माण करतोय”. कॉंग्रेसच्या उणिवा आणि कमकुवतपणाबद्दल विचारले असता ते म्हणाले, "आम्ही लोकांना ऐकतो, आम्ही वेगवेगळ्या कल्पनांचा आदर करतो. आम्ही आमचा जाहीरनामा तयार करण्यापूर्वीही लाखो लोकांशी बोलून त्यांच्या भावना जाणून घेतल्या.
'माझ्या मनात मायावती आणि अखिलेश यादव यांच्याबद्दल आदर'
'आम्ही खूप विस्कळीत असू शकतो.. उत्तर प्रदेशमध्ये मायावती आपल्या सभांमधून सतत काँग्रेसवर हल्ला करीत असल्याबाबत विचारताच ते म्हणाले की, उत्तरप्रदेशाबाबत बोलायचे झाले तर मायावती आणि मुलायम सिंह यादव यांच्यासाठी कॉंग्रेस अडचणीची आहे. परंतु माझ्या मनात मायावती आणि अखिलेश यादव यांच्याबद्दल आदर आहे. यूपीमध्ये भाजपला पराभूत करणे हाच आमचा मुख्य हेतू आहे.
कॉंग्रेसची सपा-बसपा आघाडीला मदत
उत्तर प्रदेशमध्ये जिथे आमचे उमेदवार आहेत, तिथे आम्ही सक्षमपणे लढतोय. जिथे आमचा मजबूत उमेदवार नाही, तिथे आम्ही सपा-बसपा आघाडीला मदत करत आहोत. पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबाबत बोलताना राहूल म्हणाले की, हा निर्णय घेण्याचा माझा अधिकार नाही हे जनतेने ठरवायचे आहे. जनतेच्या निर्णयांचा मी स्वीकार करेन. माझे विचार थोडे वेगळे आहेत.
Updated : 3 May 2019 2:15 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire