Home > मॅक्स रिपोर्ट > महाराष्ट्राच्या कृषी विभागात बियाणांचा मोठा घोटाळा - वसंत मुंडे यांचा गंभीर आरोप...!

महाराष्ट्राच्या कृषी विभागात बियाणांचा मोठा घोटाळा - वसंत मुंडे यांचा गंभीर आरोप...!

महाराष्ट्राच्या कृषी विभागात बियाणांचा मोठा घोटाळा - वसंत मुंडे यांचा गंभीर आरोप...!
X

जलयुक्त शिवार घोटाळ्याचे तक्रारदार वसंत मुंडे यांची कृषी संचालक दिलीप झेंडे यांच्याविरुद्ध ED कडे तक्रार करण्यात आली आहे. राज्याच्या कृषी विभागांमध्ये कृषी संचालक दिलीप झेंडे यांच्या माध्यमातून, बोगस बियाणांचा व खतांचा कोट्यावधींचा मोठा घोटाळा झाला आहे. असा आरोप करत, राज्याचे संचालक दिलीप झेंडे यांच्यासह बोगस फर्टीलायझर कंपन्या, सीड्स कंपन्यांची चौकशी करावी. अशी मागणी काँग्रेसच्या वसंत मुंडे यांनी थेट ईडी कार्यालयात तक्रार दाखल करत केली आहे.

राज्यात अनेक ठिकाणी बियाणांची लागवड करून देखील पीकं उगवले नाही. अशा स्वरूपाच्या हजारो शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या, मात्र त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. या बोगस बियाणांचा काळाबाजार, कृषी संचालक दिलीप झेंडे हे त्यांच्या भावा मार्फत चालवत आहेत. तर यामध्ये दीलीप झेंडे यांच्यासह त्यांची सर्व टीम सहभागी असल्याचा आरोप देखील वसंत मुंडे यांनी केला आहे. त्याचबरोबर कोकण भागामध्ये देखील, युरिया खताचा गैरवापर दिलीप झेंडे यांच्या सहकार्यातून झाला आहे. विशेष म्हणजे मंत्रिमंडळातील मंत्र्यांची दिलीप झेंडे यांना पाठबळ असल्यामुळे, त्यांच्यावर कारवाई होत नाही. असा देखील आरोप मुंडे यांनी केलाय. त्यामुळेच आता ईडी कार्यालयासह, मुख्यमंत्री महोदयांकडे वसंत मुंडे यांनी तक्रार केलीय. दरम्यान दिलीप झेंडे यांना तात्काळ निलंबित करावे अशी देखील मागणी वसंत मुंडे यांनी केली आहे.

दरम्यान वसंत मुंडे यांच्या तक्रारी व आरोपावरून राज्याच्या कृषी विभागासह मंत्रिमंडळात देखील, खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता ईडी काय कारवाई करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे


Updated : 27 March 2022 8:25 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top