चंद्रयान ३ Vs चंद्रयान १ : चंद्रयान १ मोहीमेतून काय मिळालं ?
X
चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यात चंद्रयान ३ ला यश मिळालंय. अशी कामगिरी करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरलाय. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर नेमकं काय आहे, तिथल्या रहस्यमय बाबी अद्याप जगासमोर आलेल्या नाहीत... मात्र, भारतीय शास्त्रज्ञांनी चंद्रयान ३ च्या यशस्वी लँडिंगनंतर ते शक्य करून दाखवलंय. आता या यशस्वी लँडिंगनंतर चंद्रयान १ मोहीमेबद्दल चर्चा सुरू झालीय. कित्येक नेटिझन्सनी गुगलवर जाऊन चंद्रयान १ मोहीमेबद्दल माहिती शोधायला सुरूवात केलीय. त्यामुळं चंद्रयान ३ आणि चंद्रयान १ मोहीमेबद्दल अत्यंत साध्या सोप्या भाषेत फरक समजून घेऊया.
चंद्रयान ३ Vs चंद्रयान १ : भारताच्या चंद्रयान मोहीमेबद्दल महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊया
चंद्रयान १ अवकाशात कधी झेपावलं
२२ ऑक्टोबर २००८ मध्ये चेन्नईच्या सतीश धवन स्पेस सेंटरमधून चंद्रयान १ यान अवकाशात झेपावलं
चंद्रयान ३ अवकाशात कधी झेपावलं
सध्या सुरू असलेलं चंद्रयान ३ हे यान १४ जुलै २०२३ मध्ये भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी चंद्राच्या दिशेनं झेपावलं. हे यान आंध्र प्रदेश मधील सतीश धवन स्पेस सेंटरच्या सेकंड लॉँच पॅडवरून चंद्राच्या दिशेनं झेपावलं.
उद्देश : चंद्रयान ३ मोहीमेचे उद्देश
चंद्राच्या पृष्ठभागावर यानाचे सुरक्षित, अलगदपणे लँडिंग करणे
चंद्रावर फिरणारे रोव्हर दाखवणे
जागेवर वैज्ञानिक प्रयोग करणे
उद्देश : चंद्रयान १ मोहीमेचे उद्देश
उच्च दर्जाचे मॅपिंग करणे
चंद्रावरील खनिज आणि रसायनांचे मॅपिंग करणे
चंद्रावर असलेल्या पाण्याचा शोध घेणे
पेलोड्स
चंद्रयान ३ पेलोड्स : या तीन गोष्टींचं काम काय ?
यान : चंद्रावर लँडर रोव्हर घेऊन जाते
लँडर : यामध्ये रांभा (RAMBHA), चाएसटीई (ChaSTE), आयएलएसए (ILSA), भूकंपाच्या माहितीसाठी LP, थर्मल, वायुमंडलीय आणि रचनात्मक विश्लेषण करणे
रोवर : यान अलगद उतरून तिथल्या रचनात्मक विश्लेषणासाठी APXS आणि LIBS काम करणे
पेलोड्स
चंद्रयान १ यानातील यंत्र आणि त्यांची काय कामं होती ?
भूप्रदेशाचं कॅमेराद्वारे मॅपिंग करणारं यंत्र (Terrain Mapping Camera (TMC) )
हायपर स्पेक्ट्ररल इमेजर
लुनर लेझर रेंजिंग इंस्ट्रुमेंट (LLRI)
उच्च क्षमतेचं X-ray स्पेक्ट्रोमीटर (HEX)
इन्फ्रारेड स्पेक्टोमीटर (SIR 2)
सब केव जे अणू परावर्तित करून विश्लेषण करणे
मिनिचेर सिंथेटिक एपार्चर रडार
नासा चं चंद्रावरील खनिजशास्त्राचं मॅपिंग करणारं यंत्र
रेडिएशन डोस मॉनिटर (RADOM)
चंद्रयान १ चे निष्कर्ष
चंद्रयान ३ मोहीमेच्या यशस्वीतेबद्दल सध्या चर्चा सुरूय. मात्र, चंद्रयान १ या मोहीमेत चंद्रावरील रसायनिक, खनिज यांचं छायाचित्रांच्या माध्यमातून अभ्यास करणं हा होता.
चंद्रावर असलेल्या पाण्याचा शोध घेणं. चंद्रयान १ मोहीमेला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं होतं. यात तापमानाशी संबंधित मुद्दे, सेंसर यंत्र न चालणं अशा आव्हनांना सामोरं जावं लागलं. अशाप्रकारे चंद्रयान १ ऑगस्ट २००९ मोहीमेचा शेवट झाला.
चंद्रयान १ मोहीतून सगळ्यात काही निष्पन्न झालं असेल ते म्हणजे चंद्राच्या आतील भागात चुंबकात्मक पाण्याची उत्पत्ती झाल्याचा पुरावा मिळाला. थोडक्यात काय तर चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या पाण्याशी संबंधित वैशिष्ट्यांचा शोध M3 उपकरणाचा वापर करून करण्यात आला होता.