Home > मॅक्स रिपोर्ट > सी बँड रडारचा शेती क्षेत्राला आधार...मराठवाड्याला होणार फायदा

सी बँड रडारचा शेती क्षेत्राला आधार...मराठवाड्याला होणार फायदा

सी बँड रडारचा शेती क्षेत्राला आधार...मराठवाड्याला होणार फायदा
X

जागतिक पातळीवर हवामान बदलाचा मोठा परीणाम झाला आहे. त्यामुळे मराठवाड्यात सतत पडणारा दुष्काळ, अतिवृष्टी आणि गारपीटीमुळे मराठवाड्यातील शेतकरी होरपळून निघत आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी 'सी बँड रडार' डॉप्लर बसवण्यात येणार आहे. त्यामुळे या अचूक अंदाजामुळे शेती व्यवसायातील मोठे नुकसान टाळता येणार आहे. तर या सी बँड रडार डॉप्लरचा मराठवाड्यातील शेती क्षेत्राला मोठा आधार मिळणार आहे.

औरंगाबाद येथे सी बँड रडार डॉप्लर बसवण्यासाठी केंद्र सरकारचे पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एस. रविचंद्रन यांनी नुकतीच मान्यता दिली. तर भारतीय हवामान खाते आणि विज्ञान मंत्रालयाच्या माध्यमातून औरंगाबमध्ये सी बँड रडार डॉप्लर बसवण्यात येणार आहे. त्याचा फायदा मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना होणार आहे.

सी बँड डॉप्लर रडारच्या मगतीने वाऱ्याचा वेग, पावसाची तीव्रतास वीजा पडण्याची माहिती, वातावरण ढगाळ राहणार की निरभ्र याची माहिती? पाऊस कोणत्या दिशेने येणार, ढगांची निर्मीती याबरोबरच कमी दाबाचा पट्टा आणि वादळी परिस्थिती याविषयी अचूक माहिती देण्यासाठी सी बँड डॉप्लर रडार ओळखले जाते. सी बँड डॉप्लर रडारने निर्माण केलेल्या सिग्नलला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून हे रडार उंच ठिकाणी ठेवावे लागते. त्यामुळे हवामान अंदाजात अचूकता येण्यास मदत होते.





डॉप्लर रडार कसे काम करते?

सी बँड डॉप्लर रडार इलेक्ट्रॉनिक सिग्नलच्या तत्वावर काम करते. यामध्ये डॉप्लर इफेक्टचा वापर केला जातो. हे सी बँड रडार 4 ते 8 सेमी वेव्ह आणि 8 ते 10 गिगाहर्टझ आकारावर काम करते. त्यामुळे यामधील डिशचा आकार एस बँड रडारपेक्षा लहान असतो. तसेच हा रडार इलेक्ट्रिक सिग्नलवर कार्य करत असल्याने त्याच्या डिशचा आकार लहान असतो. यामध्ये सिग्नल उपग्रहाकडे पाठवून ते परत आल्यानंतर त्याचा संबंधीत केंद्रात अभ्यास केला जातो. त्यामुळे वादळाची दिशा, वादळाची तीव्रता, कमी दाबाचा पट्टा, पावसाची तीव्रता आणि प्रमाण, वाऱ्याचा वेग आणि वाऱ्याची दिशा आणि पर्जन्यजन्य परिस्थितीची निर्मीती, ढगांची निर्मीती यांसह हवामानातील सुक्ष्म बदलांची माहिती देत असते.

सी बँड रडार ड़ॉप्लर उभारण्यात आल्याने या रडारच्या नियंत्रणात 300 ते 400 किलोमीटर एवढा परिघ येणार आहे. त्यामुळे या सी बँड रडार डॉप्लरच्या माध्यमातून हवामान बदलाचा अचूक अंदाज मिळाल्याने मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि पुर्व विदर्भातील जिल्ह्यांना फायदा होणार आहे. तर दुष्काळ, अतिवृष्टी, ढगफुटी आणि गारपीट सारख्या नैसर्गिक आपत्तींची माहिती मिळाल्याने पिकांचे संरक्षण करता येणार आहे.

सी बँड रडार डॉप्लरच्या माध्यमातून वेळीच हवामान बदलाची, पाऊस लांबणीवर पडण्याची, अतिवृष्टी किंवा ढगफुटी होण्याची माहिती मिळाली तर दुबार पेरणीसारखे संकट टाळता येतील. तसेच दुबार पेरणीसाठी लागणार आर्थिक भुर्दंड कमी करता येईल. त्यामुळे हा उपक्रम शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायद्याचा ठरणार आहे.

सी बँड रडार डॉप्लरचे वैशिष्ट-

हे रडार आत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत आहे. तर हे रडार सुपर कम्प्युटरच्या माध्यमातून चालणार आहे. त्यामुळे हवामान बदलाचे अचूक अंदाज मिळवणे सोपं होणार आहे. तर या रडारसाठी 15 कोटी रूपयांचा निधी लागणार आहे. तर हे रडार कार्यान्वित झाल्यावर हवामानाचा अचूक अंदाज शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर पाऊस कधी आणि किती पडणार, अवकाळी पावसाची शक्यता, वीज कुठे पडणार, परीसरात ढगफुटीची शक्यता असेल तर परिसरावर त्याचा किती परीणाम होऊ शकतो याची माहिती शेतकऱ्यांवर होणार आहे.





मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये हवामान आणि तापमानात सातत्याने बदल होत आहे. या परिसरात कधी जोरदार अतिवृष्टी होते, तर कधी दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असल्याचे विविध अहवालांमधून समोर येत आहे. मात्र आता या सी बँड रडार डॉप्लरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

21 व्या शतकात मोठ्या प्रमाणावर हवामानात बदल होत आहे. त्यामुळे मराठवाड्यासारख्या भागात कधी गारपीट, कधी अतिवृष्टी, अवेळी पाऊस तर कधी दुष्काळासारखे संकटे येत राहतात. त्यामुळे त्याचा मराठवाड्याच्या शेती क्षेत्राला मोठा फटका बसतो. त्यामुळे हवामानातील सुक्ष्म बदलांची अचूक माहिती शेतकऱ्यांना मिळाली तर पीकांचे योग्य पध्दतीने नियोजन करता येऊ शकेल व होणारे नुकसान टाळता येईल. त्यामुळे सी बँड डॉप्लर रडार शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे, असे प्रा. एच. एम. देसरडा यांनी सांगितले.

गेल्या वर्षभरापासून तात्कालिन पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे पाठपुरावा करत होतो. तर सी बँड डॉप्लर या रडारच्या माघ्यमातून हवामानाबद्दल अचूक माहिती मिळणार आहे. त्यामुळे मराठवाडा, विदर्भाचा काही भाग, उत्तर महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्र यातील शेती आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. देशात 9 ठिकाणी हे रडार बसवले जाणार आहेत, असे केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी सांगितले.

मराठवाड्यात हवामान बदलामुळे शेती क्षेत्रात मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने दहा वर्षांमध्ये किमान दहा हजार कोटी रूपये शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अनुदानावर खर्च करण्यात आली आहे. त्यामुळे सी बँड डॉप्लर ऱडारच्या माध्यमातून मराठवाड्याच्या अमुलाग्र बदल होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Updated : 24 May 2022 7:47 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top