Home > मॅक्स रिपोर्ट > आधी नगरसेविका आणि आता महापालिकेचं दुर्लक्ष, मुंबईकरांची होतेय अबाळ

आधी नगरसेविका आणि आता महापालिकेचं दुर्लक्ष, मुंबईकरांची होतेय अबाळ

मुंबईतील कुर्ला या विभागातील वॉर्ड क्रमांक 169 या ठिकाणी शिवसेना पक्षातून प्रविणा मोराजकर या निवडून आलेल्या आहेत. साबळे नगर, हनुमान नगर, आणि जागृती नगर या विभागात अतिशय घाणीचे साम्राज्य पसरलेल आहे. या ठिकाणी रस्ताची अवस्था अतिशय दयनीय पहायाला मिळत आहे. लोकांना चालताना त्रास होत आहे. या सर्व समस्यांचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रसन्नजीत जाधव यांनी...

आधी नगरसेविका आणि आता महापालिकेचं दुर्लक्ष, मुंबईकरांची होतेय अबाळ
X

राज्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरून राजकारण रंगतंय. कोण कुणासोबत युती करेल आणि आघाडी करेल आणि निवडणुका लढवेल सांगता येत नाही. पण सामान्य मुंबईकराला याचा काहीच फरक पडणार नाहीये. कारण त्याचा विचार ना हे लोकप्रतिनिधी करत आहेत ना महापालिका प्रशासन... आधी पाच वर्ष या लोकप्रतिनिधींनी मुंबईकरांकडे दुर्लक्ष केलं आणि आता प्रशासक लागल्यानंतर मुंबई महापालिका प्रशासन या स्थानिकांकडे दुर्लक्ष करत आहे. मुंबईकर मात्र आपल्या नेहमीच्या रडगाण्यात रडत बसला आहे.

अशीच अवस्था मुंबईतील कुर्ला परिसरातील नेहरू नगरवासीयांची आहे. मुंबईतील कुर्ला या विभागातील वॉर्ड क्रमांक 169 या ठिकाणी शिवसेना पक्षातून प्रविणा मोराजकर या निवडून आलेल्या आहेत. साबळे नगर, हनुमान नगर, आणि जागृती नगर या विभागात अतिशय घाणीचे साम्राज्य पसरलेल आहे. या ठिकाणी रस्ताची अवस्था अतिशय दयनीय पहायाला मिळत आहे. लोकांना चालताना त्रास होत आहे.

महानगरपालिकेचे रुग्णालय नाही.

मुंबई महानगरपालिकेचे रुग्णालय अतिशय लहान आहे. ते 24 तास सुरू नसतं. महिलांना गरोदरपणात महानगरपालिकेचे रुग्णालय असावं असे स्थानिक महिलांना वाटतं. कधीकधी गरोदर महिला रिक्षाने भाभा हॉस्पिटलला जाताना मध्ये डिलिव्हरी होते. असे तेथील स्थानिक महिला सांगतात. या विभागात गेल्या पंचवीस वर्ष शिवसेनेचे नगरसेवक निवडून येत आहेत. कुणीही रुग्णालयाच्या गंभीर प्रश्नाकडे पाहिलं नाही.

नगरसेवक जनतेतून निवडून दिला जातो. नगरसेवकाने असं केलं नाही पाहिजे. असे तिथेल स्थानिक लोक सांगतात. लोक झोपडपट्टीतून इमारतीत गेले. परंतु नाल्याचा प्रश्न तसाच आहे. तसेच साबळे नगर मध्ये रस्ता नाही रस्ता लवकरात लवकर पुढील निवडून येणाऱ्या नगरसेवकांनी बनवून द्यावा अशी स्थानिकांनी इच्छा व्यक्त केली.

स्थानिक नागरिकांपैकी काही लोक निर्मळ शौचालय अंतर्गत काम करत असताना अनेकांनी जेष्ठ नागरिकांसाठी वेगळं शौचालय असावं असा वारंवार प्रस्ताव नगरसेविकापुढे मांडलेला होता. परंतु नगरसेविकांने दुर्लक्ष केल्यामुळे आम्ही स्वतःच्या खर्चातूनच शौचालय बांधलं.., नगरसेविकांनी रस्त्याच्या मधोमध अनेक वायफळ खर्च केलेला आहे. अनेक ठिकाणी ढोल आणि पिपाणी डिझाईन असलेले वादक लावण्यात आलेले आहे. जनतेच्या समस्येवर खर्च केला असता तर आत्तापर्यंत खूप फायदा झाला असता असे स्थानिक सांगतात.

नेहरू नगर येथील नागरिकांना फक्त पंधरा मिनिट पाणी मिळतं. पाण्याच्या समस्येला स्थानिक जनता खूपच हैराण आहे. नेहरूनगर मध्ये नाल्याच्या समस्या बाबत महानगरपालिकेने हवं तसं सहकार्य स्थानिकांना केलेले नाही. ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन नाल्या मधून गेल्याने अनेक ठिकाणी नाला तुंबलेले असतात.

अनेक वेळा नगरसेविकाला सांगून देखील त्यांनी जरी सहकार्य केलं नाही तरी आम्ही महानगरपालिकेच्या ऑफिस मध्ये जातो तेथील कर्मचारी सांगतात आमच्याकडे स्टाफ खूप कमी आहे त्यामुळे आम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्ही नाला साफ करायला कर्मचारी पाठवू. तोपर्यंत स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.


Updated : 14 Oct 2022 5:43 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top